शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सायकलद्वारे खत देण्याची लढविली शक्कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 10:05 IST

नागेश भालतिलक यांनी शक्कल लढवून सायकलच्या स्टँडला दोरी बांधून आणि दुसºया बाजूला सरते बांधून त्यातून खत देण्याचा प्रयोग केला.

- राहुल सोनोने  लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु.: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच काही महाग झाले आहे. मजुरीचे दर वाढले आहेत. भाड्याच्या बैलजोडीने शेती करणे महाग झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मजुरीचे दर परवडत नाहीत. त्यामुळेच पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथील एका शेतकºयाने कपाशी पिकाला सायकलला सरते बांधून खत देण्याची शक्कल लढविली. या शेतकºयाचा प्रयोग यशस्वी ठरल्याने, परिसरातील इतरही हा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.बाभूळगाव येथील शेतकरी नागेश मधुकर भालतिलक यांनी शेतात असलेल्या कपाशी पिकाला खत देण्यासाठी शेतमजूर अधिकची मजुरी मागतात आणि बैलजोडीचेही भाडे परवडत नाही, तसेच शासनाकडून कर्जमाफी झाली; परंतु नवीन कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतीच्या वखरणी, डवरणी, निंदण, खुरपणीसोबतच खत फेकणीसाठी पैसे कुठून आणावे, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे. या प्रश्नातूनच नागेश भालतिलक यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. घरच्या घरी कपाशीला कसे खत देता येईल, याचा विचार केला. या विचारातूनच त्यांना सायकलद्वारे कपाशीला खत देण्याची कल्पना सुचली. सायकलने कपाशीला खत देण्याचा प्रयोग यशस्वी झाला. सायकलद्वारे पिकाला खतसुद्धा योग्य प्रमाणात दिल्या जाते. हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी बाभूळगाव येथील नागेश भालतिलक यांच्या शेतात पाहणीसाठी येत असून, हे शेतकरीसुद्धा त्यांच्या या प्रयोगाचे अनुकरण करीत आहेत. कमी वेळेत आणि कमी खर्चात पिकाला खत देता येत असल्याने मजुरीचे पैसेसुद्धा वाचत असल्याचे भालतिलक यांनी सांगितले.

अशी सुचली कल्पना...शेती करताना, मजुरीचे वाढलेले अव्वाच्यासव्वा दर शेतकºयांच्या नाकीनऊ आणत आहेत. पेरणीसोबत बैलजोडणीने पेरणी, खत सोडण्याची मजुरी शेतकºयांना परवडत नाही. बैलजोडी आणि एका धुरकºयाची दिवसाला मजुरी १२00 ते १५00 रुपये होते. एवढी मजुरी द्यायला पैसे नसल्यामुळे शेतकरी नागेश भालतिलक यांनी शक्कल लढवून सायकलच्या स्टँडला दोरी बांधून आणि दुसºया बाजूला सरते बांधून त्यातून खत देण्याचा प्रयोग त्यांनी केला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी