शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सोनाळा येथील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:03 IST

ग्राम पंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ४ मार्च रोजी सायंकाळी हटविले. 

किन्हीराजा (वाशिम) : येथुन जवळच असलेल्या सोनाळा येथील हनुमान मंदिर परिसरात असलेले अतिक्रमण स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ४ मार्च रोजी सायंकाळी हटविले. सोनाळा येथील हनुमान मंदिर परिसरात काही जणांनी अतिक्रमण केले होते. या ठिकाणी खासदार निधीमधून सामाजिक सभागृह मंजूर झाले असून त्यासाठी निधीही मिळाला आहे. परंतू,  नियोजित जागेवर अतिक्रमण असल्याने सभागृहाचे बांधकाम करण्यात अडथळा निर्माण झाला. सदर अतिक्रमण काढून घ्यावे यासंदर्भात ग्रामपंचायतने संबंधितांना वारंवार सूचना केल्या. परंतू अतिक्रमण काढले नाही. शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागवून अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनकडून ४ मार्च रोजी पोलीस बंदोबस्त मिळाल्याने महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतने संयुक्तरित्या अतिक्रमण हटविले. यावेळी अतिक्रमितांना घरावरील पत्रे, दरवाजे, लाकडी साहित्य व घरातील सर्व साहित्य पंचासमक्ष ताब्यात देण्यात आले. अतिक्रमण काढताना कोणताही अडथळा आला नाही. यावेळी यावेळी नायब तहसिलदार वाय .आर.हातेकर,  विस्तार अधिकारी पी.डी. लोखंडे, मंडळ अधिकारी पी.एम. पांडे, तलाठी व्हि.बी. गवळी, ग्रा.पं सचिव बी.एस. हेंबाडे, पोलीस उपनिरिक्षक राजेश पंडित, सरपंच राहुल वानखेडे यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत