शहरं
Join us  
Trending Stories
1
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
3
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
4
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
5
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
6
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
7
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
8
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
9
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
10
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
12
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
13
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
14
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
15
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
16
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
17
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
18
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
19
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
20
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले

मनपाच्या सोयीस्कर भूमिकेमुळे ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:47 PM

अकोला: सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिकेच्या सोयीस्कर भूमिकेमुळे शहरातील ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण करण्याचे उद्योग कायम सुरूच असल्याचे चित्र आहे.

अकोला: सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिकेच्या सोयीस्कर भूमिकेमुळे शहरातील ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण करण्याचे उद्योग कायम सुरूच असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या जवाहर नगर येथील खुल्या जागेवर स्थानिकांनी अतिक्रमण केल्यानंतरही या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवार भिंतीचे काम सुरू आहे. हा प्रकार पाहता शहरात कोणीही या अन् खुल्या जागेवर अतिक्रमण करा, असे चित्र समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तसेच मनपाकडे तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शहरातील ले-आउटमध्ये मूळ विकासकांनी एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १० टक्के जागा ‘ओपन स्पेस’साठी आरक्षित केल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी विपरीत आहे. आरक्षित जागांवर मूळ विकासकांनी तसेच सामाजिक हिताचा आव आणणाºया संस्थांनी व्यवसाय उभारले आहेत. घरालगत खुली जागा असल्यास त्यावर स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. साहजिकच, याप्रकरणी तक्रारकर्ता समोर आल्यास महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. असाच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक १३ मधील जवाहर नगर येथील खुल्या जागेसंदर्भात होत असल्याचे समोर आले आहे. जवाहर नगरमधील सर्व्हे नं.३९/१, ५१/१ मध्ये तब्बल ५७ हजार ३८० चौरस फूट जागा सार्वजनिक वापराकरिता आरक्षित आहे. त्यावर जिल्हा परिषद शाळेमागे व द्वारका नगरीसमोरील खुल्या जागेवर काही स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. आजरोजी ‘पीडब्ल्यूडी’ विभागाकडून या जागेवर आवारभिंत उभारण्याचे काम सुरू आहे. जागेची मोजणी न करताच आवारभिंतीचे काम केल्या जात असल्याने अतिक्रमकांना पाठीशी घातल्या जात असल्याचा आरोप परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जातीने लक्ष देऊन खुल्या जागेवरील अतिक्रमणाचा तिढा निकाली काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नगरसेवकांचे हात वर!खुल्या जागेवरील अतिक्रमण दूर करण्याची मागणी करीत स्थानिक रहिवाशांनी प्रभागातील नगरसेवकांकडे धाव घेतली. त्यावर भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी हात वर केल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का?ले-आउटमधील ‘ओपन स्पेस’वर एखादा राजकीय नेता, पदाधिकारी किंवा वजनदार व्यक्तीने ताबा केल्यास त्याच्या विरोधात सहसा कोणी तक्रार करण्यास धजावत नाही. अशा ठिकाणी तक्रार प्राप्त नसल्यामुळे कारवाई करता येत नसल्याची लगंडी सबब मनपा प्रशासनाकडून समोर केली जाते. जवाहर नगरमधील ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण होत असल्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबारात तसेच मनपाकडे तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका