शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गातील अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:47 IST

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणामुळे लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र सुरू आहे

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही सर्वच मागासप्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरक्षित तसेच खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती न देण्याच्या शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणामुळे लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. हा प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनच्यावतीने येत्या २७ आॅगस्ट रोजी नागपुरात मुख्यमंत्री सचिवालयावर धडक मोर्चा काढला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या एम. नागराज विरुद्ध भारत सरकार या प्रकरणाच्या निकालातील अटींची पूर्तता महाराष्ट्र शासनाने केली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा आरक्षण कायदा-२००१ शाबूत ठेवून त्यासंदर्भातील २५ मे २००४ रोजीचा शासन निर्णय रद्द केला होता. त्यावेळी मागासलेपणा, पर्याप्त प्रतिनिधीत्व व प्रशासनाची कार्यक्षमता याबाबत संख्यात्मक अहवाल तयार करणे, त्यानुसार राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जाती, विशेष मागासप्रवर्गातील अधिकारी- कर्मचाºयांना पदोन्नती आरक्षण लागू करणे सहज शक्य असताना महाराष्ट्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी लगतच्या कर्नाटक राज्यात या पद्धतीने पदोन्नती देण्यात आली, हे विशेष.त्यानंतर जरनैल सिंग विरुद्ध गुप्ता या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने १७ मे २०१८ रोजी निर्णय देताना मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती देण्याचा आदेश दिला. त्यामध्ये अनारक्षित ते अनारक्षित व आरक्षित ते आरक्षित प्रवर्ग अशाप्रकारे पदोन्नती देणे चुकीचे ठरवून मागासवर्गीयांना गुणवत्तेवर आधारित पदोन्नती देणे वैध ठरवले. त्यानंतर महाराष्ट्र शासन विरुद्ध घोगरे या याचिकेवर सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ५ जून २०१८ रोजी कायद्यानुसार प्रतिबंध नसल्याचाही आदेश दिला. त्यानुसार केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशासन विभागाने १५ जून २०१८ रोजी पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्याच्या सूचना दिल्या. या आदेशानंतरही महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. इतर कोणत्याही राज्याने खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देणे बंद केले नसताना फक्त महाराष्ट्रातच बंद करण्यात आले. हा अन्याय रोखण्यासाठी २७ आॅगस्ट रोजी यशवंत स्टेडिअमवरून मोर्चा काढण्यात येत आहे.

- केवळ पत्राद्वारे रोखली पदोन्नतीराज्य शासनाने सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासनाचे विविध आदेशाची अंमलबजावणी केली नाही. तसेच कोणताही शासन निर्णय न काढता २९ डिसेंबर २०१७ रोजी सामान्य प्रशासन विभागाने एका पत्राद्वारे मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देणे बंद केले. त्यामुळे राज्यातील लाखो अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित झाले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEmployeeकर्मचारी