शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

वृक्षसंवर्धनासाठी झाडांसोबत भावनिक नाते गरजेचे! -  ए. एस. नाथन 

By atul.jaiswal | Published: July 13, 2019 5:45 PM

वलेल्या प्रत्येक झाडासोबत भावनिक नाते-सबंध जोडले, तरच ते झाड जगण्याची शक्यता अधिक असते आणि यामाध्यमातूनच वृक्षसंवर्धन मोहिमा यशस्वी होऊ शकतात.

- अतुल जयस्वाल

अकोला : पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज असून, लावलेल्या प्रत्येक झाडासोबत भावनिक नाते-सबंध जोडले, तरच ते झाड जगण्याची शक्यता अधिक असते आणि यामाध्यमातूनच वृक्षसंवर्धन मोहिमा यशस्वी होऊ शकतात, असे मत भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मुळचे तामिळनाडू राज्यातील व गत पाच वर्षांपासून अकोल्यात राहून राज्यभर वृक्षसंवर्धनासाठी झटत असलेल्या ए. एस. नाथन यांच्याशी साधलेला संवाद....प्र. वृक्षसंवर्धन मोहिमेकडे कसे व कधी वळलात ?नाथन : बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरचा ºहास होत आहे. वृक्षतोड मानवाच्या मुळावर उठत आहे. झाडे जगली तरच मानवाचे अस्तित्व टिकेल असा विचार मनात आला. तसेच झाडांची सेवा ही इश्वराची सेवा करण्यासारखे असल्याचे माझे ठाम मत आहे. यातूनच वर्ष २०११ मध्ये वृक्षसंवर्धनासाठी काम करण्यास सुरुवात केली. यासाठी राज्यभर फिरून संशोधन केल्यानंतर भारत वृक्ष क्रांती संघटनेची स्थापना केली.प्र. वृक्षसंवर्धनासाठी अकोला जिल्ह्याची निवड कशी केली?नाथन : रोजगाराच्या शोधार्थ २००७ मध्ये मुंबई येथे आलो व तेथे चित्रपटसृष्टीत मिळेल ते काम केले. त्यानंतर वृक्षसंवर्धनासाठीच्या एका उपक्रमाबाबत मंत्रालयात गेलो असता तेथे परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची भेट झाली व त्यांनी अकोल्यात येण्याची गळ घातली. तेव्हापासून अकोल्यात वृक्षसंवर्धनाचे प्रयोग राबवित आहे.प्र. आतापर्यंत कोण-कोणते उपक्रम राबविले?नाथन : महाराष्ट्रात वृक्षसंवर्धनाची सुरुवात ‘एक दाखला-एक झाड’ या उपक्रमाने केली. यानंतर ‘एक विवाह-एक झाड’हा उपक्रमही लागू करावा, यासाठी प्रयत्न केले. ‘एक जन्म - एक झाड’ व ‘एक विद्यार्थी - एक झाड’ हे दोन उपक्रम अकोला पॅटर्न म्हणून राज्यभरात लागू करण्यात यशस्वी होऊ शकलो. ‘एक जन्म - एक झाड’ या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने हजारो झाडे लावण्यात आली आहेत.प्र. सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबद्दल काय सांगाल ?नाथन : शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी वृक्षारोपण मोहिम स्तुत्यच आहे. या मोहिमेअंतर्गत लावण्यात येणाऱ्या झाडांसोबत मानसांची भावनिक सांगड घालण्याची गरज आहे. मानवी वस्त्यांमध्ये मनुष्याला उपयोगी अशा झाडांचे रोपण केल्यास ती झाडे जगण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गावांमध्ये आंबा, चिंच, बेल यासारखी फळझाडे लावणे गरजेचे आहे. जंगलांमध्ये वड, पिंपळ यासारखी मोठी झाडे लावणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :interviewमुलाखतAkolaअकोलाenvironmentपर्यावरण