शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर एमराल्ड  कॉलनीतील कुटुंबाला लुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:42 IST

अकोला : अकोली खुर्द परिसरातील एमराल्ड कॉलनीतील एका घरामध्ये घुसून तिघा जणांना चाकूचा धाक दाखवून कुटुंबीयांकडून ५२ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवाशिम बायपास रोडवरही चोरी नव्या ठाणेदारांना चोरट्यांची सलामी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोली खुर्द परिसरातील एमराल्ड कॉलनीतील एका घरामध्ये घुसून तिघा जणांना चाकूचा धाक दाखवून कुटुंबीयांकडून ५२ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या जागेवर नुकतेच रुजू झालेले ठाणेदार गजानन पडघन यांना चोरट्यांनी पहिली सलामी दिली. अकोली खुर्द परिसरातील एमराल्ड कॉलनीमध्ये राहणारे नीलेश आत्माराम वानखडे (३३) हे मंगळवारी रात्री कुटुंबातील सदस्यांसह घरात झोपलेले होते. त्यांच्या घराच्या आवारभिंतीचे कुलूप आणि घराचा कडीकोयंडा तोडून तिघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात कुणीतरी घुसल्याची चाहूल वानखडे कुटुंबाला लागल्यावर सर्वजण जागे झाले. घरातील सदस्य जागे झाल्यामुळे आपल्या मनसुब्यावर पाणी फेरल्या जाईल, असे चोरट्यांना वाटले. चोरट्यांनी वानखडे कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून सोने, रोख रक्कम कुठे आहे, याची विचारणा केली. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील दहा ग्रॅम सोन्याची पोथ, कानातील रिंग पाच ग्रॅम, कानातील कर्णफुले पाच ग्रॅम, लहान मुलाच्या बोटातील अंगठी दोन ग्राम, एक ग्रॅमचे लॉकेट आणि रोख १२ हजार रुपये असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे घाबलेल्या नीलेश वानखडे यांनी जुने शहर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. नीलेश वानखडे यांच्या तक्रारीनुसार जुने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला. 

चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक भयभीतगत काही दिवसांपासून शहरातील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंगच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. शहरात चेनस्नॅचिंग घटना तर दररोजच घडत आहेत. यामुळे महिला, वृद्ध धास्तावलेले आहेत. महिलांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. 

सागर कॉलनीत ८६ हजारांची घरफोडीवाशिम बायपास रोडवरील सागर कॉलनीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आकाश मनीराम वाकोडे (४३) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील पर्समधील ६५00 रुपये रोख आणि नवी कोरी विनाक्रमांकाची ८0 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८६ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणात बुधवारी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. - 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा