शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहर विभागात आठ महिन्यांत १ कोटी ११ लाखांची वीज चोरी उघड

By atul.jaiswal | Updated: January 20, 2019 16:13 IST

अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागात जुन २०१८ ते जानेवारी २०१९ या आठ महिन्यात राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधी मोहिमेत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली.

ठळक मुद्दे विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार एकूण २५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. १ कोटी ११ लक्ष रुपयांच्या बिलापोटी १८५ ग्राहकांकडून ८५ लक्ष रुपये वसूल करण्यात आलेले आहेत.यामध्ये ११जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकोला: महावितरणच्याअकोला शहर विभागात जुन २०१८ ते जानेवारी २०१९ या आठ महिन्यात राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधी मोहिमेत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली. अकोला शहरातील तीनही उपविभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार एकूण २५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे . यामध्ये ११जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून, ८५ लक्ष रुपये वसूल करण्यात आलेले आहेत.वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात कारवाईचे सत्र सातत्याने सुरु आहे. महावितरणच्या अकोला शहर विभागात १ जून २०१८ पासून आतापर्यंत जवळपास आठ महिन्यामध्ये वेळोवेळी वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवून आतापर्यंत २५५ पेक्षा जास्त वीज चोरांविरूध कारवाई करून ११लाख ६६ हजार ५५७ युनिट्सची वीज चोरी व गैरवापर उघड केला आहे. सदर वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात आलेल्या १ कोटी ११ लक्ष रुपयांच्या बिलापोटी १८५ ग्राहकांकडून ८५ लक्ष रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. तसेच १५० ग्राहकांकडून वीज चोरी प्रकरणी नियमाप्रमाणे तडजोड करून रु. १२ लक्ष रुपये रकमेचा भरणा शासनास केला आहे. सदर कारवाई अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांचे मार्गदर्शनाखाली अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांचे नेतृत्वात अतिरिक्त कार्यकारी अभियंते मोरेश्वर सिरसे, अजितसिंह दिनोरे व गणेश महाजन तसेच भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता संतोष राठोड यांच्या पथकातील अभियंते कर्मचारी व जनमित्रांनी केली आहे.कारवाईचा धडका सुरुच राहणारवीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण प्रशासन गंभीर आहे. शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून, यापुढे सुद्धा गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने धडक मोहिम राबवूनआकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. 

नागरिकांनी वीजचोरी, वीजेचा अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घ्यावी.प्रामाणिकपणे वीज वापर करून तसेच नियमितपणे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.- प्रशांत दाणी, कार्यकारी अभियंता, अकोला शहर विभाग

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण