शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदीवरील बॅरेजेस परिसरात वीज सुविधांची कामे संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:28 IST

वाशिम : ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण आले. या बॅरेजेस परिसरात आता मंजूर असलेल्या ९५ कोटींच्या निधीतून विजेच्या सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्याची गती अगदीच संथ असून चार उपकेंद्रांसाठी ३२ किलोमिटर दुर असलेल्या हिंगोलीवरून ‘पॉवर’ घेणे अडचणीचे ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सिंचनाची प्रभावी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून बॅरेजेस उभारण्यात आले. हे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र, सिंचनाकरिता पाणी घेण्यासाठी लागणारी विजेची सुविधा अद्यापपर्यंत उभी झालेली नाही. मध्यंतरी शासनाने ९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वीज सुविधांच्या कामांना परवानगी दिली. त्यानुसार, सद्या बॅरेजेस परिसरात साधारणत: १२ नवीन उपकेंद्र, ३३ केव्हीची १६५ किलोमिटर उच्च दाब वाहिनी, ११ केव्हीची ३१० किलोमिटर उच्चदाब वाहिनी टाकणे तथा १९०० नवीन रोहित्र उभारण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या कामांची गती अगदीच कमी असून ५० ते ६० रोहित्र बसविण्याची कामेच पूर्ण होवू शकली आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे वाशिममध्ये कुठेच ‘पॉवर’ शिल्लक नसल्याने बॅरेजेस परिसरातील महत्वपूर्ण ठरणाºया कोकलगाव, अटकळी, गणेशपूर आणि उकळीपेन या चार उपकेंद्रांसाठी ३२ किलोमिटर दुर असलेल्या हिंगोलीवरून ‘पॉवर’ आणली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यूत लाईन टाकावी लागणार असून ही बाब तुलनेने अडचणीची ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम