शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कोठडीतील वृद्ध आरोपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:30 IST

रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्याजवळ असलेल्या तात्पुरत्या कारागृहातील बंदिवान वृद्ध आरोपीची बुधवारी रात्री अचानक प्रकृती चिंताजनक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्याजवळ असलेल्या तात्पुरत्या कारागृहातील बंदिवान वृद्ध आरोपीची बुधवारी रात्री अचानक प्रकृती चिंताजनक झाली. त्याला त्वरित सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी कलम १७४ अन्वये अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध आरोपीच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्यांतर्गत कोलसारा गावातील रहिवासी जगदेव मारोती वरघाट (६५) असे मृतकाचे नाव आहे. वरघट कुटुंबातील सहा सदस्यांनी कुटुंबातील सुनेवर शारीरिक व मानसिक अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, या आरोपावरून जगदेव वरघट यांच्यासह वरघट कुटुंबातील ५ सदस्यांव्यतिरिक्त एका महिलेवर ३० जून रोजी गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी १ जूनला आरोपींना अटक केली. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सर्व आरोपींना ३ जुलै रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सर्व आरोपींना तात्पुरत्या स्वरूपातील कारागृहात टाकण्यात आले आहे.या दरम्यान बुधवारी रात्री आरोपी जगदेव वरघाट अचानक आजारी पडला. त्याने तुरुंगात आपल्या कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली. त्याने तुरुंगातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर जगदेव वरघट याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. न्यायालयीन कोठडीत या वृद्ध आरोपींचे शवविच्छेदन करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यावर गुरुवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत अहवाल मिळाला नव्हता. त्यामुळे मृत्यूचे कारण समोर आले नाही.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी