शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Srikanth Shinde: एकनाथ शिंदेंना मिळालेले मुख्यमंत्रिपद थेट नव्हे ४० वर्षाच्या मेहनतीचे फळ, श्रीकांत शिंदेंचा टाेला

By राजेश शेगोकार | Updated: August 23, 2022 14:56 IST

Srikanth Shinde: एकनाथ शिंदे यांनी सामान्य कुटूंबातून संघर्ष करत त्यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे.  त्यामुळेच ते लाेकांचे नेते असून सर्वाना सहज उपलब्ध असतात असा टाेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

- राजेश शेगोकारअकाेला - एकनाथ शिंदे यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे थेट मिळाले नाही, त्यांनी ४० वर्ष परिश्रम केले, संघटना वाढविली, सामान्य कुटूंबातून संघर्ष करत त्यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे.  त्यामुळेच ते लाेकांचे नेते असून सर्वाना सहज उपलब्ध असतात असा टाेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

खा. शिंदे हे वाशीम येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरिता अकाेल्यात आले असता माजी आ. गाेपीकिशन बाजाेरिया यांच्या निवासस्थानी झालेल्य कार्यक्रमात बाेलत हाेते. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी राज्यभर लवकरच दाैरे करू, आम्ही घेतलेला निर्णय याेग्यच हाेता याची साक्ष राज्यभरातील जनतेच्या प्रतिसादावरून लक्षात येते. आमचे मुख्यमंत्री हे जनतेचे आहेत, त्यांना भेटण्यासाठी काेणाचीही चिठ्ठी लागत नाही, ते सहज उपलब्ध असतात, २४ तास लाेकांमध्ये राहतात त्यामुळे निवेदन, अर्ज, विनंती असा प्रकार त्यांच्याकडे नाही थेट प्रश्नाला हात घालून ऑन द स्पाॅट प्रश्न साेडविण्यावर त्यांचा भर असल्याचे खा. शिंदे म्हणाले.

यावेळी मंचावर भाजपाचे नेते आ.प्रविण दरेकर, परभणीचे खासदार हेमंत पाटील, माजी आ. गाेपीकिशन बाजाेरिया, आ. लखन मलीक, आ. विप्लव बाजाेरिया, अकाेला जिल्हा शिवसेनाप्रमुख अश्वीन नवले आदी उपस्थित हाेते. माजी आ. बाजाेरिया यांनी प्रास्ताविकात अकाेल्याच्या विमानतळाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती देत धावपट्टी वाढविणे तसेच रात्रीचे उड्डाण याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांचे लक्ष वेधले. संचालन महानगरप्रमुख याेगेश अग्रवाल यांनी केले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे