शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयाच्या एनआयसीयूमधून बाळ पळविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 23:26 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांनी सतर्कता बाळगून सदर महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले. सिटी कोतवाली पोलिसांनी सदर महिलेस अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास एका वेडसर दिसणा-या महिलेने बालरोग चिकित्सा विभागातील वार्ड क्र. २३ मध्ये असलेल्या एनआयसीयूमध्ये प्रवेश केला. सदर महिला कुणाची नातेवाईक असेल म्हणून सुरक्षा रक्षकांनी तिला आत जाऊ दिले. यावेळी आतमध्ये सोनू संदीप अंबडारे (२६, रा. नागपूर-बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला) या त्यांच्या २१ दिवसांच्या बाळाला दूध पाजत होत्या.

महिलेच्या मांडीवरील बाळ हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे भेदरलेल्या सोनू अंबडारे व जवळ बसलेल्या सुनीता महाकाळ यांनी आरडाओरड केल्याने एकच खळबळ उडाली. याप्रसंगी कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका जया खांबालकर यांनी वेडसर महिलेस पकडून एनआयसीयू बाहेर काढले व सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. सुरक्षा रक्षकांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.