शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शिक्षकांसाठी होणार ‘शिक्षणाची वारी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 14:55 IST

राज्य शासनाने गतवर्षीपासून शिक्षण क्षेत्रात आगळेवेगळे प्रयोग राबविणारे आणि गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रयोग करणा-या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा शिक्षणाची वारी १४, १५ व १६ डिसेंबर रोजी अमरावती येथे होणार आहे. या वारीमध्ये विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक सहभागी होणार आहे.

ठळक मुद्देनावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे स्टॉलगुणवत्ता विकासाच्या प्रयोगांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्य शासनाने गतवर्षीपासून शिक्षण क्षेत्रात आगळेवेगळे प्रयोग राबविणारे आणि गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रयोग करणा-या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा शिक्षणाची वारी १४, १५ व १६ डिसेंबर रोजी अमरावती येथे होणार आहे. या वारीमध्ये विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक सहभागी होणार आहे. शासनाचा शिक्षण विभाग राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाच्या माध्यमातून पायाभूत चाचणी, डिजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक उपक्रम राबवित आहे. यासोबतच राज्यातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक प्रयोग करून, नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्माण करून गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गतवर्षी लातूर व नागपूर येथे शिक्षणाची वारी घेण्यात आली होती. यंदा शिक्षण वारी अमरावती शहरात आयोजित करण्यात आली आहे. शिक्षणाच्या वारीचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी शिक्षण उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विदर्भातील माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाºयांची बैठक बोलावण्यात आली होती. यंदाच्या शिक्षणाची वारीमध्ये महाराष्ट्रात ज्या शिक्षकांनी यशस्वीरीत्या शैक्षणिक उपक्रम राबविले, दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे शैक्षणिक साहित्य निर्माण केले, अशा शिक्षकांचे ५0 स्टॉल राहणार आहेत. शिक्षणाच्या वारीमध्ये शैक्षणिक साहित्यासह, गुणवत्ता विकासाचे प्रयोग, त्यांची मांडणी, सादरीकरण आणि काही प्रकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्यामध्ये काही शाळांमधील शिक्षकांनी लोकसहभागातून टॅब उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. अशा तंत्रस्नेही शिक्षक त्यांच्याकडील उपक्रमांचे सादरीकरण करणार आहेत. शिक्षणाच्या वारीतून शाळांमधील शिक्षकांना काही नवीन शिकता यावेत, त्यांना शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा आयोजनामागील उद्देश आहे.शिक्षणाची वारीसाठी जिल्ह्यातून २00 शिक्षकअमरावती येथे होणाºया शिक्षणाची वारी उपक्रमासाठी जिल्ह्यातून प्राथमिकचे १५0 शिक्षक आणि माध्यमिकचे ५0 शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या ५0 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकAkola cityअकोला शहर