शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२00५ पूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीपीएफ खाते सुरू करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:47 IST

१ नोव्हेंबर २00५ पूर्वी सेवेत रूजू झालेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जीपीएफ खाते सुरू करून नियमित कपात करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक नेते शेखर भोयर यांनी १ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन केली होती.

अकोला: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालानुसार १ नोव्हेंबर २00५ पूर्वी सेवेत रूजू झालेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जीपीएफ खाते सुरू करून नियमित कपात करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक नेते शेखर भोयर यांनी १ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन केली होती. त्यानुसार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण उपसचिवांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जीपीएफचा निर्णय मार्गी लागला तर शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल.१ नोव्हेंबर २00५ पूर्वीच्या व नंतर १00 टक्के अनुदान मिळालेल्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जीपीएफ खाते उघडून रकमेची कपात करण्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांच्या बाजुने निर्णय दिल्यानंतरही शिक्षण विभागाने त्याची अंमलबजावणी केली नाही. यासंदर्भात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु त्याला यश मिळाले नाही. केवळ आश्वासनेच शिक्षण विभागाकडून देण्यात येत होती. शिक्षक महासंघाचे नेते शेखर भोयर यांनी १ जानेवारी रोजी मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २00५ पूर्वी सेवेत रूजू झालेल्या कर्मचा-यांचे जीपीएफ (जुनी पेन्शन योजना) खाते उघडून त्यांच्या मासिक पगारातून नियमित कपात करण्यात यावी आणि शाळा ही २00५ पुर्वी १00 टक्के अनुदानावर नसलेल्या अथवा २00५ नंतर अनुदानावर आलेल्या कर्मचा-यांचा समावेश करण्यात यावा. असे म्हटले. त्यानुसार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण उपसचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक