शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे १२ मेन्यू; गुरुजींचे वाढले टेन्शन; शिक्षण विभागाचे मार्गदर्शनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 10:12 IST

हिशेब कसा ठेवावा? शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

नितीन गव्हाळे

अकोला : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने १२ मेन्यूचे प्रकार ठरवून दिले. प्रत्येक दिवशीचे मेन्यू कार्ड शिक्षक, मुख्याध्यापकांना दिले आहे. मुलांना पोषण आहार मिळत असला, तरी १२ मेन्यू शिक्षकांसाठी डोकदुखी ठरत आहेत. 

विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्यामुळे आता  आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून  वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश केला. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला, तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ यांचा हिशेब ठेवावा लागणार आहे. तो कसा ठेवावा? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

कधीपासून करणार सुरू

शालेय शिक्षण विभागाने पोषण आहारामध्ये १२ मेन्यू वापरण्याचे निर्देश ६ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारी सर्व केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पोषण आहार देण्यास सांगितले आहे. 

या आहेत अडचणी 

नाचणीसत्व, दूध पावडर, साखर, गुळ, सोयाबीन वडी, कांदा, लसूण, तेल, जिरे, कडधान्य आदी साहित्याचा पुरवठा झालेला नाही.  दिवसभरातून तीनवेळा मुलांना नाचणीसत्व, तांदळाची खीर, पुलाव, मोड आलेले कडधान्य द्यावे लागेल.  नाचणी सत्व हे अन्नधान्य महामंडळाकडून पुरविण्यात येणार आहे. मात्र, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने वरील साहित्य खरेदी करून बिल सादर करायचे. शिक्षण संचालकांमार्फत त्याची रक्कम देण्यात येईल. तसेच हिशोब ठेवून बिले जमा करायची. त्यांची वही, रजिस्टरमध्ये नोंद करायची.

कोणत्या पाककृती ?

पोषण आहारामध्ये भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळीची खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण-भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य आदी पदार्थांचा समावेश आहे.

 केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांना जि.प. सीईओंच्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. लागणारे साहित्य मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी करून शिक्षण संचालकस्तरावर देयक द्यावे. -रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक