कांदा प्रतवारी करणे झाले सोपे;  डॉ.पदेकृविने केले यंत्र विकसित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:50 PM2018-05-31T18:50:06+5:302018-05-31T18:50:06+5:30

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित केले असून, या यंत्राच्या निर्मितीमुळे कांदा पिकांच्या हंगामात जलदगतीने प्रतवारी करणे सोपे झाले.

Easy to grade onion; Dr. PDKV developed the machine | कांदा प्रतवारी करणे झाले सोपे;  डॉ.पदेकृविने केले यंत्र विकसित  

कांदा प्रतवारी करणे झाले सोपे;  डॉ.पदेकृविने केले यंत्र विकसित  

Next
ठळक मुद्देया यंत्राद्वारे आठ तासांत २० टन कांद्याची प्रतवारी केली जाते.त्यासाठी केवळ चार मजूर लागतात. एवढ्याच कांद्याची मजुराकरवी प्रतवारी करण्यासाठी एका दिवसाला ३० कुशल मजूर लागतात.


अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित केले असून, या यंत्राच्या निर्मितीमुळे कांदा पिकांच्या हंगामात जलदगतीने प्रतवारी करणे सोपे झाले. एका दिवसात, कमी मनुष्यबळात कोणतीही इजा न होता या यंत्राने २० टन कांद्याची प्रतवारी केली जात असल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाºया कुशल मजुरांचा प्रश्न निकाली निघणार असल्याचा दावा संशोधन अभियंत्यांनी केला.
कांदा उत्पादनात महाराष्टÑ देशात अग्रगण्य असून, लागवड क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्टÑाचा उत्पादनाचा वाटा हा २७ टक्के (४५.४६ दशलक्ष टन) एवढा, तर क्षेत्र ४.६६ दशलक्ष हेक्टर आहे. महाराष्टÑासह कर्नाटक, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश तामिळनाडू, राजस्थान आणि हरियाणा हेही महत्त्वाची कांदा उत्पादक राज्य आहेत. पण, कांदा प्रतवारी करण्यासाठी कुशल मजूर मिळत नसल्याच्या कांदा उत्पादक शेतकºयांच्या तक्रारी होत्या. या अनुषंगाने या कृषी विद्यापीठाने हे यंत्र विकसित केले. या यंत्राद्वारे आठ तासांत २० टन कांद्याची प्रतवारी केली जाते. त्यासाठी केवळ चार मजूर लागतात. एवढ्याच कांद्याची मजुराकरवी प्रतवारी करण्यासाठी एका दिवसाला ३० कुशल मजूर लागतात. त्यासाठी प्रतिटन ३०० रुपये खर्च येतो, तर यंत्राने प्रतवारी केल्यास केवळ ७५ रुपये खर्च येत असल्याने हे यंत्र शेतकºयांसाठी वरदान ठरेल, असाही दावा कृषी संशोधन अभियंत्यांनी केला.

Web Title: Easy to grade onion; Dr. PDKV developed the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.