शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पूर्व, पश्चिम विदर्भात विकासाचा समतोल साधण्यासाठी विकास मंडळात हव्या उपसमित्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 12:48 IST

अकोला : पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या विकासाचा समतोल साधण्यासाठी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाप्रमाणे विदर्भ विकास मंडळाच्या अधीन अमरावती व नागपूर विभागासाठी प्रत्येकी एक उपसमिती स्थापन करण्याची मागणी विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार यांनी केली आहे.

ठळक मुद्दे सर्वच बाबतीत पश्चिम विदर्भ हा पूर्व विदर्भाच्या तुलनेत बराच पीछाडीवर आहे. पूर्व विदर्भातील जिल्हे हे वेगाने विकास करीत असल्याची भावना पश्चिम विदर्भातील लोकांच्या मनात आहे. अमरावती व नागपूर विभागासाठी प्रत्येकी एक अशा दोन स्वतंत्र उपसमित्या असाव्या, अशी मागणी आता जोर धरत आहे.

अकोला : पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या विकासाचा समतोल साधण्यासाठी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाप्रमाणे विदर्भ विकास मंडळाच्या अधीन अमरावतीनागपूर विभागासाठी प्रत्येकी एक उपसमिती स्थापन करण्याची मागणी विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार यांनी केली आहे. यासाठी विकास मंडळ आदेश २०११ मध्ये दुरुस्ती करण्याची विनंती त्यांनी एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.राज्याची विभागणी उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशा तीन विभागात झाली असून, या विभागांसाठी विकास मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ हा सर्वच बाबतीत मागास असल्याची वस्तुस्थिती आहे. आता विदर्भातही अमरावती विभाग (पश्चिम विदर्भ) आणि नागपूर विभागात (पूर्व विदर्भ) विकासाचा असमतोल दिसून येत आहे. सिंचन, पाण्याची उपलब्धता, दरडोई उत्पन्न, रस्ते, उद्योग, शैक्षणिक संस्था, विजेची दरडोई खपत या सर्वच बाबतीत पश्चिम विदर्भ हा पूर्व विदर्भाच्या तुलनेत बराच पीछाडीवर आहे. अनुकूल परिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील जिल्हे हे वेगाने विकास करीत असल्याची भावना पश्चिम विदर्भातील लोकांच्या मनात आहे. विदर्भाचा विकास साधण्यासाठी विदर्भ विकास मंडळ कार्यरत असले, तरी मंडळाकडूनही पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भावर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.विदर्भातील या दोन विभागांमध्ये वाढत चाललेला विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी या विभागांमधील विकासाचे मुद्दे जोरकसपणे मांडण्यासाठी विदर्भ विकास मंडळाच्या अधीन अमरावती व नागपूर विभागासाठी प्रत्येकी एक अशा दोन स्वतंत्र उपसमित्या असाव्या, अशी मागणी आता जोर धरत आहे.विकास मंडळे आदेश २०११ च्या अनुच्छेद ४(२) व ४ (३) अन्वये उर्वरित महाराष्ट्रासाठी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळासोबतच प्रत्येक विभागासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक-उपसमिती असावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार या विभागांमध्ये उपसमित्या कार्यरत असून, या समित्या त्या-त्या विभागातील विकासाच्या मुद्यांवर लक्ष ठेवतात. याच धर्तीवर अमरावती व नागपूर विभागासाठी उपसमित्या स्थापन करण्यासाठी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी डॉ. खडक्कार यांनी केली आहे.

विदर्भ प्रदेशातील दोन महसूल विभागातील विकासातील असमतोल या उपसमितीच्या स्थापनेनंतर निश्चितपणे समोर येईल. तो दूर करण्यासाठी विदर्भ विकास मंडळ, समन्वयाची भूमिका घेऊन प्रयत्न करू शकेल.- डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळAmravatiअमरावतीnagpurनागपूर