शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ई-वे बिलिंगची व्यापार्‍यांत धास्ती; फेब्रुवारीपासून अनिवार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 02:22 IST

अकोला : फेब्रुवारी महिन्यापासून सक्तीच्या होणार्‍या ई-वे बिलिंगमुळे व्यापारी -उद्योजकांच्या मनात धडकी भरली आहे. एकीकडे व्यापारी थेट जीएसटी पोर्टलवरून ई-वे बिलिंगची माहिती घेत असले, तरी जीएसटी कार्यालयाच्यावतीने मात्र अद्याप जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देजनजागृतीपर कार्यक्रम कागदावरच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फेब्रुवारी महिन्यापासून सक्तीच्या होणार्‍या ई-वे बिलिंगमुळे व्यापारी -उद्योजकांच्या मनात धडकी भरली आहे. एकीकडे व्यापारी थेट जीएसटी पोर्टलवरून ई-वे बिलिंगची माहिती घेत असले, तरी जीएसटी कार्यालयाच्यावतीने मात्र अद्याप जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. अवघ्या पंधरा दिवसांनंतर ई-वे बिलिंगची प्रक्रिया देशात तीव्र होणार असल्याने व्यापार्‍यांनी काय करावे, काय करू नये, हे चित्र स्पष्ट नसल्याने व्यापार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.ई-वे बिलिंगची अंमलबजावणी आगामी फेब्रुवारीपासून देशभरात होणार आहे. दरम्यान, १६ जानेवारीपासून उत्तराखंड राज्याने ई-वे बिलिंगला सुरुवात केली आहे. ई-वे बिलिंग सप्लायर, रिसिव्हर आणि जीएसटी नोंदणीकृत कंपनीकडून विकत  घेणार्‍या किंवा विकणार्‍या कंपनी किंवा व्यक्तीला आवश्यक आहे. रिजेक्शन, सेल रिटर्न, रिपेअर-सांभाळ करणार्‍यांनाही ते गरजेचे राहील. ५0 हजार रुपये किमतीच्या वर असलेल्या मालासाठी ई-वे बिलिंग आवश्यक राहणार आहे. ई-वे बिलिंगचे दोन भाग करण्यात आले आहेत. एका भागात गुडस रिसिव्हर, साहित्य, त्याचे किमतीचा  संदर्भ राहणार आहे. दुसर्‍या भागात वाहतुकीची माहिती, वाहन क्रमांक आणि जीआर क्रमांकाचा त्यात समावेश असेल. एका वाहनात जर विविध प्रकारचे साहित्य वाहून नेले जात असेल, तर वाहन चालकाकडे कॉन्सिलिडेटेट ई-वे बिलिंग असणे गरजेचे आहे. शू्न्य ते शंभर किलोमीटर अंतरासाठी एक दिवस ई-वे बिलिंगची मुदत राहील. तीनशे किलोमीटरपर्यंत तीन दिवस, पाचशे कि लोमीटरपर्यंत पाच दिवस, हजार किलोमीटरपर्यंत पंधरा दिवस मुदत राहणार आहे. जर ई-वे बिलिंग फाईलिंग झालेले नसेल, तर जीएसटी इनव्हाईसच्या दोनशे पट दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे ई-वे बिलिंग संदर्भात व्यापारी-उद्योजकांमध्ये धडकी भरलेली आहे. फेब्रुवारीपासून जीएसटी अधिकार्‍यांकडून अकस्मात तपासणीदेखील होण्याची शक्यता आहे.

कर बुडव्यांवर अंकुशकेवळ नाममात्र बिल घेऊन जिल्हा, राज्य आणि देशात व्यवहार करणार्‍या व्यापारी-उद्योजकांनी मोठय़ा प्रमाणात कर चोरी केल्याचे समोर आले आहे. त्या कर बुडव्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आता ई-वे बिलिंग महत्त्वाचे ठरणार आहे. या माध्यमातून कर बुडवे शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :GSTजीएसटीAkola cityअकोला शहर