lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीमधील ई-वे बिलामुळे कोणावर येऊ शकते संक्रांत?

जीएसटीमधील ई-वे बिलामुळे कोणावर येऊ शकते संक्रांत?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कालच मकर संक्रांत झाली. सर्वांना तीळगूळ मिळाले. सरकारने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:36 AM2018-01-15T01:36:22+5:302018-01-15T01:36:29+5:30

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कालच मकर संक्रांत झाली. सर्वांना तीळगूळ मिळाले. सरकारने

Who can come to GST due to e-way bill? | जीएसटीमधील ई-वे बिलामुळे कोणावर येऊ शकते संक्रांत?

जीएसटीमधील ई-वे बिलामुळे कोणावर येऊ शकते संक्रांत?

- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कालच मकर संक्रांत झाली. सर्वांना तीळगूळ मिळाले. सरकारने
ही करदात्यांना ई-वे बिलाचे
तीळगूळ दिले, परंतु आता ई-वे बिलामुळे कोणा-कोणावर संक्रांत येणार आहे ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, ई-वे बिल हे वस्तूंच्या हालचालीचा पुरावा देणारे जीएसटी पोर्टलवर निर्मित झालेले इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आहे. १६ जानेवारी म्हणजेच उद्यापासून या तरतुदी चाचणीच्या आधारावर लागू करण्यात येतील आणि १ फेब्रुवारीपासून ई-वे बिल नियमाची अंमलबजावणी होईल. म्हणून ई-वे बिलामुळे विक्रेता, खरेदीदार आणि वाहतूकदार यांवर संक्रांत येणार आहे.
अर्जुन : कृष्णा, विक्रेत्यासाठी ई-वे बिलचे काय महत्त्व आहे?
कृष्ण : अर्जुना, विक्रेता म्हणजे पुरवठादार. जर वाहतुकीचे मूल्य रु. ५००००/ पेक्षा जास्त असेल, तर ई-वे बिलाची निर्मिती अनिवार्य आहे. ई-वे बिलमध्ये प्राप्तकर्त्याचा जीएसटीआयएन, पावती क्र., दिनांक, वस्तूंचे मूल्य, एचएसएन कोड इत्यादी तपशील द्यावा लागेल. या तपशिलाच्या आधारे पोर्टलवर पुरवठादाराचे जीएसटीआर १ तयार होईल, म्हणून विक्रेत्यासाठी ई-वे बिल महत्त्वाचे आहे.
अर्जुन : कृष्णा, खरेदीदारासाठी ई-वे बिलचे काय महत्त्व आहे ?
कृष्ण : अर्जुना, खरेदीदार म्हणजे प्राप्तकर्ता. प्राप्तकर्त्यासाठी तर ई-वे बिल खूप महत्त्वाचे आहे. प्राप्त झालेल्या संपूर्ण वस्तूंचा तपशील ई-वे बिलद्वारे तपासला जाऊ शकतो. आपल्या आॅर्डरप्रमाणेच पुरवठा झाला का? त्याचे मूल्य, वस्तूंचा एचएसएन, इत्यादी गोष्टी प्राप्तकर्ता ई-वे बिलावरून तपासू शकतो.
अजुर्न : कृष्णा, वाहतूकदाराचा आणि ई-वे बिलाचा काही संबंध आहे का?
कृष्ण : अर्जुना, वाहतूकदार हा विक्रेता आणि प्राप्तकर्ता यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. विक्रेता आणि प्राप्तकर्ता या दोघांनाही ई-वे बिल निर्मित केले नाही, तर ती जबाबदारी वाहतूकदारावर येते. ज्याच्याकडून माल घेतला, ज्याला माल पोहोचवतोय, गाडी नं. इत्यादी सर्व तपासण्याचे काम वाहतूकदाराचे आहे. जर वाहतुकीसाठी मध्येच गाडी बदलली, तर वाहतूकदाराने पोर्टलवर फॉर्म जीएसटी ईडब्ल्यूबी ०४ अपलोड करावा. वाहतूकदाराने जर ई-वे बिल निर्मित नाही केले, तर त्याला करदायित्व किंवा रु. १० हजार यामध्ये जे जास्त असेल, तेवढी पॅनल्टी भरावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, कर अधिकाºयासाठी ई-वे बिलचे काय महत्त्व आहे?
कृष्ण : अर्जुना, ई-वे बील आणि आणि कर अधिकारी यांचा दोन वेळेस सामना होईल. अगोदर वाहतुकीच्या वेळी रस्त्यावर उभे राहून ते मालाची तपासणी करतील आणि नंतर निर्धारणाच्या वेळीदेखील कर अधिकारी ई-वे बिलाची तपासणी करतील. जर काही तफावत आढळली, तर कर अधिकारी कारवाई आणि मालाची जप्तीदेखील करू शकतील. विक्रेता, प्राप्तकर्ता, वाहतूकदार किंवा कर अधिकारी यांचे बेकायदेशीर वर्तनामूळे रस्त्यावरील भ्रष्टाचार वाढू शकतो.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण : अर्जुना, १ फेब्रुवारीपासून ई-वे बिलाचा प्रारंभ होणार आहे. ई-वे बिलामुळे वाहतूकदारावर संक्रांत येणार आहे. वाहतुकीमधील सर्वांत महत्त्वाचा दुवा हा वाहतूकदार आहे. वाहतूकदाराने काही गोंधळ केला, तर विक्रेता आणि प्राप्तकर्ता दोघेही संकटात सापडतील. म्हणून जीएसटीच्या तरतुदींचे पालन करूनच वाहतूकदाराने मालाची वाहतूक करावी.

Web Title: Who can come to GST due to e-way bill?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी