शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूरात दारुच्या दुकानांवर प्राध्यापकांची ड्यूटी; समन्वयक म्हणून सोपविली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 14:02 IST

दारु दुकानांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व इतर अटी, शर्तींच पालन होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला :  संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन प्रचार आणि प्रसाराचे काम केले; मात्र त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्याच कर्मभूमीत स्थापन झालेल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या नऊ प्राध्यापकांची ड्यूटी चक्क दारुच्या दुकानावर लावण्याचा आल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नऊ दारु दुकानांवर या प्राध्यापकांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, दारु दुकानांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व इतर अटी, शर्तींच पालन होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम सोपविण्यात आले आहे. 

गत दोन दिवसापासून महाराष्ट्र शासनाने राज्यभरात देशी व विदेशी दारू विक्रीचे नियम ठरवून दिले आहेत. तब्बल महिनाभरानंतर दारूचे दुकान एवढी झाल्यामुळे दारुड्याची प्रचंड गर्दी या दुकानांवर उसळली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना यांचा बोजवारा उडण्याची भीती निर्माण झाली आहे.  ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी व व तेथे ये दारू विक्रीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनांची खातरजमा करण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील दारु दुकानांवर चक्क प्राध्यापकांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सर्वच्या सर्व प्राध्यापक संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे आहेत.  विशेष म्हणजे अनेक महाविद्यालयीन युवक या दारूविक्री च्या रांगेत प्राध्यापकांना आढळून येतात;  मात्र ड्युटी म्हणून या शिक्षकांना त्याच विद्यार्थ्यांकडे कानाडोळा करावा लागत आहे. संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीतच हा प्रकार घडावा, यापेक्षा दुर्दैव कोणते, असे अनेक व्यसनमुक्ती प्रचारकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

 

 सदर प्राध्यापकांना जाणीवपूर्वक दारूच्या दुकानावर ड्युटी देण्यात आलेली नाही. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळानुसार आम्ही शिक्षकांना रेशन दुकान वर इतर कर्मचाºयांना चेक पोस्टवर तर काही कर्मचाº्यांना इतर जबाबदारी दिली आहे. उर्वरित जे मनुष्यबळ उपलब्ध होते ते दारूच्या दुकानावर लावण्यात आले आहे. त्यामध्ये प्राध्यापक आले आहेत; मात्र हे जाणीवपूर्वक घडलेले नाही. याचा मी पुन्हा आढावा घेतो.प्रदिप पवार,  तहसीलदार, मुर्तीजापूर

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरTeacherशिक्षक