शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धूळ, हवेतील कार्बन कण ठरताहेत श्वसनसंस्थेसाठी  कर्दनकाळ

By atul.jaiswal | Updated: November 20, 2019 12:21 IST

हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.

अकोला : वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या व रस्ते, इमारतींच्या बांधकामांमुळे वातावरणात मिसळणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. जगभरात मानवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया रोगांमध्ये श्वसनविकार तिसºया क्रमांकावर असल्याची माहिती प्रसिद्ध फुप्फुस व श्वसन नलिका तज्ज्ञ व दुर्बिन परीक्षक डॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी मंगळवारी येथे दिली.जागतिक ‘क्रॉनिक आॅब्सट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉ. भांबुरकर यांनी श्वसनसंस्थेशी संबंधित विकार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि औषधोपचार पद्धतीची सखोल माहिती दिली. वातावरणातील धूळ, कार्बन, सल्फेट नायट्रेट, कार्बन मोनोआॅक्साईड व २.५ मायक्रॉन आकाराचे इतर कण हे श्वसनसंस्थेसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत डॉ. भांबुरकर म्हणाले की, वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्य प्रचंड धोक्यात सापडले आहे. यामध्ये श्वसनविकाराला बळी पडणाºयांची संख्या मोठी आहे. अनेक वर्ष प्रदूषित हवेत काम करणाºया व्यक्ती, धूम्रपान करणाºया व्यक्ती व अनुवांशिकता असणाºया व्यक्तींमध्ये श्वसनसंस्थेशी संबंधित विकार आढळून येतात.  श्वसनविकारांमध्ये सीओपीडी, जुनाट खोकला, अस्थमा, अ‍ॅलर्जी, कफ पडणे, घसा खरखर करणे, कोरडी ढास लागणे आदी विकारांचा समावेश आहे. श्वसनसंस्थेच्या इतर विकारापेक्षा सीओपीडी हा अत्यंत घातक आजार असून, यामध्ये श्वसननलिका आकुंचन पावतात व त्या कायमस्वरूपी तशाच राहतात.  सीओपीडी हा अत्यंत घातक असला, तरी नियमित औषधापचार व संतुलित आहारामुळे त्यावर नियंत्रण मिळविता येते, असेही डॉ. भांबुरकर यांनी सांगितले.

सीओपीडीची लक्षणे

  • श्वासनलिका लालसर होणे
  • अंतस्थ त्वचेवर कफ चिकटणे
  • श्वासनलिका संवेदनशिल होऊन संकुचित होणे

भारतात दरवर्षी आढळतात २ कोटी रुग्णश्वसनसंस्थेच्या विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, २०१६-१७ मध्ये आलेल्या एका अहवालानुसार भारतात दरवर्षी श्वसनसंस्थेशी संबंधित विकाराचे २ कोटी रुग्ण आढळून येतात. यामध्ये पुरुषांची संख्या ६५ टक्के, तर महिलांची संख्या ३५ टक्के एवढी असल्याचे डॉ. भांबुरकर यांनी सांगितले.

 निदानासाठी विविध चाचण्याश्वसनविकारांचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या उपलब्ध आहेत. यामध्ये स्पायरोमेटरी, पल्स आॅक्सिमेट्री, ब्राँकोस्कोपी या चाचण्यांचा समावेश आहे.

हे अवश्य करा

  • धूम्रपान टाळा
  • कचरा जाळणे टाळा
  • बाहेर फिरताना मास्क किंवा रुमालचा वापर करा
  • नियमित व्यायाम व योगासने
टॅग्स :Akolaअकोलाair pollutionवायू प्रदूषणHealthआरोग्य