शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धूळ अन् थंडीमुळे दमा रुग्णांचा वाढला त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:49 IST

दमाच्या रुग्णांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.

अकोला : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरणामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहे. अशा वातावरणाचा आरोग्याला फटका बसत असून, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मुख्य रस्त्यांच्या निर्माण कार्यामुळे शहरात सर्वत्र धूळ पसरली असून, दमा रुग्णांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दमाच्या रुग्णांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून काही दिवसांपूर्वीच अकोला अव्वलस्थानी पोहोचले. वाहनांच्या धुरासोबतच रस्त्यावरील धुळीच्या कणांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा अकोलेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, सर्वाधिक धोका दमा आजारांच्या रुग्णांना होत आहे. हवेतील धुळीच्या कणांमुळे दमा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून, त्यांच्यासाठी हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत अकोलेकरांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.हे करा...

  • बाहेर निघताना मास्कचा वापर करावा.
  • धुळीच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
  • उघड्यावरील तळलेले खाद्यपदार्थांचे सेवन टाळा.
  • श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

‘जीएमसी’त औषधे मर्यादितच!सर्वोपचार रुग्णालयात इतर औषधांसोबतच दमा रुग्णांसाठी आवश्यक औषधच उपलब्ध नव्हते. महिनाभरापूर्वी हाफकिनमार्फत औषधांचा पुरवठा करण्यात आला; परंतु हा औषधांचा साठा काही दिवस पुरेल, असा आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता हा औषध साठा जास्त दिवस पुरणार नसल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

थंडीमुळे दम्याच्या रुग्णांना त्रास होतो; पण रस्त्यावरील वाढलेल्या धुळीमुळे हा त्रास जास्त वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य