शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

अकोला जिल्हय़ात स्वामित्वधन बुडवून वीटभट्ट्यांवर मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 7:38 AM

जिल्ह्यात प्रदूषण अधिनियमाला हरताळ फासून सुरू असलेल्या वीटभट्टय़ांवर विटांसाठी स्वामित्वधनाची रक्कम न भरताच अवैधपणे कोट्यवधींची माती वापरली जात असल्याचा प्रकार घडत आहे.

अकोला : जिल्ह्यात प्रदूषण अधिनियमाला हरताळ फासून सुरू असलेल्या वीटभट्टय़ांवर विटांसाठी स्वामित्वधनाची रक्कम न भरताच अवैधपणे कोट्यवधींची माती वापरली जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्याकडेही महसूल विभागाचे दुर्लक्ष असून, वीटभट्टीवरील विटांचे मोजमाप करून स्वामित्वधनाची वसुली करण्याची मागणी पुढे येत आहे.जिल्हय़ातील सर्वाधिक वीटभट्टय़ा अकोट उपविभागात सुरू आहेत. त्या वीटभट्टीधारकांकडून गौण खनिजाच्या महसुलाला चुना लावला जात आहे. हा प्रकार महसूल अधिकारी निमूटपणे सहन करीत आहेत. त्यातून शासनाचे दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान होत असल्याची बाब सातत्याने मांडण्यात आली आहे. छोट्या वीटभट्टीवर एका भट्टीतून ४0 हजार विटांची निर्मिती केली जाते. त्यासाठी ४0 ब्रास माती एका आठवड्यात लागते. महिन्याला १६0 ते २00 ब्रास माती या भट्टीवर लागते. नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात १२00 ते १४00 ब्रास मातीचा वापर त्या वीटभट्टी मालकाकडून केला जातो. प्रत्यक्षात स्वामित्वधन २00 ते ३00 ब्रासचे अदा केले जाते. त्यातून १000 ब्रास मातीचे स्वामित्वधन बुडवले जाते. मोठय़ा वीटभट्टी चालकांकडून ४00 ब्रास मातीचे स्वामित्वधन घेतले जाते. त्याआधारे चार ते पाच वीटभट्टय़ा चालवल्या जातात. आठवडाभरात एका भट्टीवर लाखापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात. त्यासाठी मातीचा वापर अवैधपणे केला जातो. माती वाहतुकीची पास दोन ब्रासची असताना वाहनातून चार ब्रासची वाहतूक केली जाते. या सगळ्या प्रकारांकडे महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. त्यातून काहींचे हितसंबंधही गुंतले असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जाते. काहींनी मुद्दामपणे डोळेझाक सुरू केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या तक्रारीही जिल्हाधिकार्‍यांकडे सातत्याने केल्या जात आहेत.