शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

औषधोपचाराअभावी अल्पभूधारक शेतक-याचा मृत्यू!

By admin | Updated: April 15, 2016 02:22 IST

आजारपण असतानाही केवळ पैशांअभावी औषधोपचार न घेता आल्यामुळे अल्पभूधारक शेतक-याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.

शिर्ला (पातूर, अकोला): घरी अठराविश्‍वे दारिद्रय़.. चार एकर शेतीच्या तुकड्याशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही..त्यात दुष्काळ..दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत.. अशा बिकट परिस्थितीत सहा महिन्यांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्याने खाटेला खिळवून ठेवले. आजारपण असतानाही केवळ पैशांअभावी औषधोपचार न घेता आल्यामुळे खचलेल्या एका अल्पभूधारक शेतकर्‍याचा गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पातुर तालुक्यातील शिर्ला येथील विनायकराव उत्तमराव अंधारे ( ६४) यांच्याकडे चार एकर शेती होती. यातूनच ते आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांचे शरिर लुळे पडले . सुरूवातीला त्यांनी जुजबी औषधोपचार घेतला; परंतु परिस्थितीअभावी पुढचा महागडा औषधोपचार शक्य न झाल्यामुळे विनायकराव कायमचे अंथरुणाला खिळले. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळल्यामुळे आधीच अठराविश्‍वे दारिद्रय़ असलेल्या अंधारे कुटुंबावर डोंगरच कोसळला. विनायकराव यांच्या घरात पत्नी, मुलगा आणि सून, तसेच चार वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने दगावलेल्या मोठय़ा मुलाची मुलगी एवढे सदस्य आहेत. मुलगा मिळेल ते काम करून सर्वांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही वेळच्या जेवणाची भ्रांत असताना विनायकराव औषधोपचार घेऊ शकले नाही. यंदा दुष्काळामुळे नापिकी झाली. गत चार वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. या हलाखीच्या परिस्थितीत गुरुवारी विनायकरावांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अर्धांगवायूने अंथरूणाला खिळलेल्या विनायकरावांना वेळीच उपचार मिळाला असता, तर ते वाचू शकले असते, अशा प्रतिक्रिया गावकर्‍यांनी व्यक्त केल्या आहेत. रुढी, परंपरेला दिली तिलांजली रुढी, परंपरेनुसार निधनानंतर धार्मिक विधी पार पाडले जातात. या खर्चिक प्रकाराला फाटा देण्याचा निर्णय अंधारे कुटुंबियांनी घेतला. विनायकराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याप्रसंगी खर्चिक रुढी परंपरांना तिलांजली देण्याची घोषणा दिलीप मोतीराम अंधारे यांनी सर्व नातेवाईकांसमोर केली. त्याला समाजबांधवांनी सर्मथन दिले.