शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१0४ क्रमांक ठरतोय रुग्णांना आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:18 IST

अकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्वच ठिकाणच्या  शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना  वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचा बोजवारा  उडाला आहे.

ठळक मुद्देदांडीबहाद्दर डॉक्टरांवर वचक नंबर डायल करताच मिळतो प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्वच ठिकाणच्या  शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना  वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचा बोजवारा  उडाला आहे. यावर उपाय म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने १  नोव्हेंबर २0१७ पासून उपलब्ध करून दिलेली १0४ या टोल फ्री  क्रमांकाची सेवा रुग्णांसाठी आधार ठरत आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.  कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.  प्राथमिक उपचारासाठीही रुग्णालयामध्ये तिष्टत बसावे लागते.  शवविच्छेदन डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे वेळेवर होत नाही. जेव्हा रुग्ण प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात  जातात, तेव्हा डॉक्टर तेथे उपस्थित नसतात. म्हणून रुग्णांना मोफत  आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागते. डॉक्टरांनी रुग्णालयात थांबलेच  पाहिजे, यासाठी शासनाने अनेक उपाय करून पाहिले; मात्र डॉक्टरांनी  पळवाटा शोधण्याचे काम केले. दैनंदिन हजेरी असो की बायोमेट्रिक पद्धत,  या फेल ठरल्याने कामचुकार डॉक्टरांचे फावत आहे. यासाठी राज्याच्या  आरोग्य खात्याने दांडीबहाद्दर डॉक्टरांवर ‘वॉच’ राहावा, यासाठी १  नोव्हेंबरपासून १0४ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या  क्रमांकावर संपर्क साधून रुग्ण आपली तक्रार नोंदवू शकतात. 

पुण्यातून होते ‘कंट्रोल’शवविच्छेदन तत्काळ करायचे आहे, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात  घेऊन गेलेले आहात, काहीतरी इर्मजन्सी आहे, महिलांची प्रसूती आहे,  बाळ आजारी आहे आणि प्राथमिक किंवा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उ पस्थित नाहीत, आरोग्याची सुविधा नाही, अशावेळी रुग्णाने किंवा  रुग्णाच्या नातेवाइकाने फक्त १0४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा  आणि आपली तक्रार नोंदवायची. हा कॉल पुण्यामध्ये उभारलेल्या कंट्रोल  रूमला जाईल. तेथे २५ कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्यात आले  आहेत. त्यांच्याजवळ राज्यातील सर्व ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालया तील डॉक्टरांचे नाव आणि संपर्क क्रमांक आहेत. अवघ्या काही सेकंदांत  संबंधित रुग्णालयामध्ये कोणाची ड्युटी आहे आणि ते सध्या कोठे आहेत,  याची माहिती घेतली जाईल व संबंधित डॉक्टरांना तातडीने रुग्णालयात  धाडले जाईल. संबंधित रुग्णालयामध्ये डॉक्टर उपस्थित नसतील, तर  रुग्णाला कोणत्या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे, त्याची माहिती दिली  जाईल. प्रत्येक घडामोडीची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी  आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही दिली जाईल.  

एखाद्या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी १0४  क्रमांक डायल करावा. कंट्रोल रूममधून त्यांच्या समस्येचे नक्कीच  निराकरण होईल. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरचे गैरहजेरीचे कारण योग्य  नसेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल. - डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.

टॅग्स :Healthआरोग्य