शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

विमानात बसायचे, संसद, राष्ट्रपती भवन पाहायचे स्वप्न ‘लोकमत’मुळे साकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 2:53 PM

मोठं होऊन विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया बोरगाव मंजू येथील हवाई सफर विजेता विद्यार्थी अंशुल सचिन निवाणे (१३) याने व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत अंशुल निवाणे याने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत तो जिल्ह्यातून विजेता ठरला. रात्री हवाई सफरवरून परत आलेल्या अंशुलने ‘लोकमत’शी रविवारी दुपारी संवाद साधला आणि दिल्ली प्रवासाच्या आठवणी कथन केल्या.‘लोकमत’चे जेवढे आभार मानावेत, तेवढे कमी आहेत, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

अकोला : आई... मला छोटेसे विमान दे ना... विमान घेईन... आकाशी उडविन... असेच स्वप्न मुले बालपणी रंगवितात. मुलांना विमानाचे भारी आकर्षण. विमानात बसून, आकाशाची छान सैर करायची हौस असते. परंतु, ती हौस काही पूर्ण होत नाही. परंतु, त्यांची ती स्वप्ने, त्यांची हौस भागविण्याचे काम ‘लोकमत’ने केले. बालवयातच विमान सफरीसोबतच संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी केवळ ‘लोकमत’मुळेच मिळाली. मोठं होऊन विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया बोरगाव मंजू येथील हवाई सफर विजेता विद्यार्थी अंशुल सचिन निवाणे (१३) याने व्यक्त केली.‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत अंशुल निवाणे याने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत तो जिल्ह्यातून विजेता ठरला. नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी त्याची निवड झाली. २६ जूनला रात्री हवाई सफरवरून परत आलेल्या अंशुलने ‘लोकमत’शी रविवारी दुपारी संवाद साधला आणि दिल्ली प्रवासाच्या आठवणी कथन केल्या. संस्कारांचे मोती उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत अंशुल २६ जूनला सकाळी ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यावर तेथील विमाने पाहून अक्षरश: मी भारावून गेले. हे सर्व माझ्यासाठी स्वप्नवत होते. विमानात बसल्यावर दिल्लीला दीड तासांत आम्ही सर्वजण पोहोचलो. पहिल्यांदाच विमानात बसण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिल्लीला गेल्यावर गोवा, महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांचीही भेट दिली. विमानतळावर बस घ्यायला आली. बसमध्ये बसूनच राजधानी दिल्लीची सैर केली. जे टीव्हीवर पाहायचो. ते प्रत्यक्षात बघायला मिळाले, याचा आनंद वाटला. दुपारी १.३0 वाजता राष्ट्रपती भवनला पोहोचलो. अंशुल सांगत होता, याठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केले. त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगत, जीवनातील संघर्ष सांगितला आणि त्यांनी जेही करा ते आवडीने, आत्मविश्वाने करा, असा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधला. एवढेच नाही, तर राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, ऐतिहासिक लाल किल्लासुद्धा पाहायला मिळाला. अशा शब्दात अंशुल त्याचे प्रवास वर्णन सांगत होता. सायंकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावरून आम्ही नागपूरकडे हवाई उड्डाण केले. एकूणच संपूर्ण प्रवास आनंददायी आणि स्वप्नवत होता, असे अंशुल म्हणाला. 

विमान, दिल्ली अनुभवण्याचे स्वप्न पूर्ण झालेअंशुल निवाणे हा बोरगाव मंजू येथील माउंट कारमेल शाळेत इयत्ता सातवीत शिकतो. वडील सचिन निवाणे किराणा दुकान चालवितात. वडील सचिन, आई नीता यांनी, आम्ही कितीही मनात आणले असते, तरी अंशुलला विमानात बसविण्याचे स्वप्न साकार करू शकलो नसतो. परंतु, लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धेमुळे त्याला विमान, दिल्ली येथील ऐतिहासिक स्थळे अनुभवण्याची संधी मिळाली. राजकीय नेत्यांसोबत संवाद साधायला मिळाला. त्यामुळे ‘लोकमत’चे जेवढे आभार मानावेत, तेवढे कमी आहेत, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाLokmat Eventलोकमत इव्हेंट