लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठाच्या क्रीडा मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात नवे संशोधन, तंत्रज्ञानाची दालने शेतकर्यांना माहितीसाठी ठेवली जाणार आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, शासनाचा कृषी विभागाच्यावतीने आयोजित या प्रदर्शनाला दरवर्षी लाखो शेतकरी भेट देऊन संशोधन, तंत्रज्ञान अवगत करीत असतात. यावर्षी असेच नवे तंत्रज्ञान येथे उपलब्ध असेल. हवामान बदल आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम यानुषंगाने कृषी विद्या पीठाचे मॉडेल, पानलोट विकास, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पशुपालनाचा पूरक व्यवसाय, कृषी माल प्रक्रिया उद्योगावर विशेष भर यावर्षी देण्यात आला असून, शेतकर्यांना यासंदर्भात अचूक माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी येथे तज्ज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करतील, तसेच शेतकर्यांच्या शेतीसंबंधी उद्भवणार्या प्रश्नाचे निरसन करतील. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष दालनाची येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. २७ ते २९ डिसेंबरपर्यंत तीन दिवस चालणार्या कृषी प्रदर्शनाची कृषी विद्यापीठाने जय्यत तयारी केली आहे. यावर्षी मोठे तीन डोम उभारण्यात येणार आहेत.
अकोल्यात २७ ते २९ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय 'अँग्रोटेक' कृषी प्रदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 19:15 IST
अकोल्यात राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठाच्या क्रीडा मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
अकोल्यात २७ ते २९ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय 'अँग्रोटेक' कृषी प्रदर्शन!
ठळक मुद्देनवे संशोधन, तंत्रज्ञानाची शेतकर्यांना मिळणार माहितीकृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर २७ ते २९ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन आयोजित