शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अकोल्यातील महिला डॉक्टर आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 13:05 IST

यामधील अंकिता खंडेलवाल ही महिला डॉक्टर अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौक परिसरातील रहिवासी असून, तिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे.

- सचिन राऊत

 अकोला: मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात डॉ. पायल तडवी हिचा रॅगिंगद्वारे प्रचंड छळ केल्यानेच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन महिला डॉक्टरांविरुद्धमुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील अंकिता खंडेलवाल ही महिला डॉक्टर अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौक परिसरातील रहिवासी असून, तिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे, तर तिची साथीदार डॉ. भक्ती मेहेरला अटक करण्यात आली असून, तिसरी साथीदार डॉक्टर हेमा आहुजा फरार आहे. या तीनही डॉक्टरांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्रीरोग विभागात दुसºया वर्षात (एम.डी.) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेरे आणि अकोल्यातील रहिवासी रतनलाल प्लॉट चौकातील एका महाविद्यालयासमोरील रहिवासी डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनी मानसिक त्रास देऊन अपमानित केले होते. डॉ. अंकिता खंडेलवाल हिचे वैद्यकीय शिक्षण नागपूर येथून झाल्याची माहिती असून, त्यानंतर ती मुंबईत उच्च शिक्षणासाठी होती. याच दरम्यान तिने आणखी दोन डॉक्टरांसोबत मिळून पायलचा प्रचंड छळ केला. त्यामुळे कंटाळून पायलने गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलचे फेब्रुवारी २०१६ साली सलमान तडवी यांच्यासोबत लग्न झाले होते. सलमान सध्या कूपर रुग्णालयात सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. पायलने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. त्यानंतर ती मुंबईत असताना या तीन महिला डॉक्टरांनी तिचा छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामधील भक्तीला अटक करण्यात आली आहे. अंकिता खंडेलवाल आणि हेमा आहुजा या दोघी फरार आहेत. या तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून प्रचंड छळ झाल्यानेच डॉ. पायल तडवी यांनी गळफास घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून, तसे काही पुरावे त्यांच्या मोबाइलमध्येसुद्धा आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून, आंदोलनेही छेडण्यात आली आहेत. या प्रकरणात डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अंकिताच्या जामीन अर्जावर बुधवारी मुंबईतील न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpayal tadvi suicideपायल तडवीMumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीसdoctorडॉक्टर