शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’चा जयघोष करीत महामानवाला वंदन!

By संतोष येलकर | Updated: April 14, 2024 17:52 IST

प्रकाश आंबेडकर यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन; बौध्द महासभा, समता सैनिक दलाची मानवंदना...

 

अकोला: प्रज्ञासूर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार १४ एप्रिल रोजी अकोला शहरासह जिल्हयात उत्साहात साजरी करण्यात आली. सामुहिक त्रिशरण पंचशिल ग्रहण करुन, विविध कार्यक्रम, उपक्रमांसह मिरवणूकव्दारे ‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’ असा जयघोष करीत, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात करण्यात आले.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरातील अशोक वाटीकासह जिल्हयातील गावागावांत बौध्द विहारांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये सामुहिक त्रिशरण पंचशिल व बुध्द वंदना घेण्यात आली. तसेच महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यासह विचारावर मंथन करीत अभिवादन करण्यात आले. 

यासोबतच विविध ठिकाणी भोजनदान कार्यक्रम, गीत गायन व विविध उपक्रमांसह मिरवणुकीव्दारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत अभिवादन करण्यात आले. अकोला शहरातील अशोक वाटिका येथे डाॅ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन आंबेडकरी अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. जयंतीनिमित्त डाॅ.बाबासाहेब यांना वंदन करण्यासाठी बौध्द उपासक, उपासिकांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी अनुयायांची सकाळपासूनच गर्दी झाली होती.

प्रकाश आंबेडकर यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन; बौध्द महासभा, समता सैनिक दलाची मानवंदना -महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हयाच्यावतीने शहरातील अशोक वाटीका येथे आयोजित कार्यक्रमात डाॅ.बाबासाहेब यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर, प्रा.अंजली आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांच्या उपस्थितीत भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दलाच्यावतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. तसेच सामुहिक त्रिशरण पंचशिल व बुध्द वंदना घेवून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे.वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष यू.जी.बोराळे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, विजय जाधव, विजय हिवराळे, गणेश दंदी, रामचंद्र वाकोडे, प्रतिभा अवचार, सिध्दार्थ देवदरीकर, धीरज इंगळे, पराग गवइ, विश्वास बोराळे आदींसह बौध्द उपासक, उपासिका, बौध्द महासभा, समता सैनिक दल, फुले शाहू आंबेडकर विद्वतसभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीAkolaअकोला