शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून जीवे मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 14:44 IST

पत्नीवर असलेल्या संशयातून त्याने सोमवारच्या पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जिजा हिला खलबत्त्याने ठेचून मारले.

आलेगाव (अकोला) : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या आलेगाव येथे एका पतीने त्याच्या पत्नीची बत्त्याने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा जीव घेतल्याचे सांगण्यात येत असले, तरी नेमक कारण पोलिस तपासात समोर येईल. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोहर भिका मेटांगे असे या कृरकर्मा पतीचे नाव असून, हे कृत्य केल्यानंतर त्याने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला.मेहकर तालुक्यातील जनुना येथील एक कुटुंब आलेगाव येथील गोरक्षण मध्ये वास्तव्यास होते. मनोहर भिका मेटांगे व जिजा मनोहर मेटांगे असे या जोडप्याचे नाव आहे. मनोहर भिका मेटांगे याचे त्याची पत्नी जीजा मनोहर मेटांगे (२५) हिच्यासोबत वाद होता. प्राप्त माहितीनुसार, पत्नीवर असलेल्या संशयातून त्याने रविवार व सोमवारच्या रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास जिजा हिला खलबत्त्याने ठेचून मारले. यावेळी आठ वर्षाची मुलगी घरात होती. तिने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक धावून आले. जिजाचा खून केल्यानंतर मनोहर ने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीचा अत्यंत भेदरलेला आवाज व आरडाओरड ऐकून काहीतरी अघटीत घडले याचा अंदाज आल्याने शेजारी नागरिकांनी घराचा दरवाजा तोडला. आठ वर्षाच्या मुलीसह दोन वर्षाच्या मुलाला नागरिकांनी बाहेर काढले व पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंके. ठाणेदार गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड, गजानन पोटे, देवेंद्र चव्हाण, बालाजी सानप, अमोल कांबळे, सुनील भाकरे, घटनास्थळी पोहोचले. ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले, त्यांनीही तपासणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोच्च रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे. पती मनोहर हिरामण मेटांगे याने पत्नीची हत्या करून स्वतः डोक्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तोही जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे हलविण्यात आले आहे. आरोपी मनोहर हिरामण मेटांगे ३५ यांच्याविरुद्ध भादविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  उपनिरीक्षक रामराव राठोड करीत आहे. याप्रकरणी बाळापूरचे एसडीपीओ रोहिणी सोळंके यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून