खेट्री (अकोला), दि. १५- पाण्याच्या शोधात वणवण भटकणार्या हरिणावर तीन कुत्र्यांनी केलेल्या हल्लय़ामुळे जखमी झालेले हरीण नंतर दगावल्याची घटना १५ मार्च रोजी परिसरातील चान्नी-चतारी रस्त्यावर घडली. शेतात काम करणारे सुरेश मेसरे, बाळू गावंडे, पुरुषोत्तम राजाराम मुंडे या शेतमजुरांनी हरिणास कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. हल्लय़ात हरीण जबर जखमी झाले होते. सदर घटनेची माहिती त्यांनी चतारीचे पोलीस पाटील विजय सरदार यांना दिली. त्यांनी ही बाब त्वरित वन परिक्षेत्र अधिकारी एस.व्ही. देवरे व चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांना दिली. संबंधित अधिकार्यांनी वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पाठविले; परंतु तोपर्यंंंत जखमी हरीण दगावले होते.
कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण दगावले!
By admin | Updated: March 16, 2017 02:40 IST