वाडेगाव (जि. अकोला) : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात प्रवेश करून एका कुत्र्याने दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना चावा घेतला. ही घटना सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास घडली. यामध्ये दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी गजबजलेली होती. सकाळी ११ वाजता राष्ट्रगीत झाल्यानंतर विद्यार्थी आपआपल्या वर्गांमध्ये जात असताना शाळेच्या आवारात अचानक एक कुत्रा आला. कुणाला काही कळण्याच्या आतच या कुत्र्याने इयत्ता पहिलीचा विद्यार्थी अनुकुल संतोष लांडे (६) व दुसºया इयत्तेचा विद्यार्थी सुभान खाँ कयुम खाँ (८) या दोघांना चावा घेतला. ही बाब लक्षात येताच केंद्र प्रमुख रमेश राठोड, शिक्षक मनोज वाडकर, व्ही. एम. वाकोडे यांनी प्रसंगावधान राखत सैरभैर झालेल्या कुत्र्याला पिटाळून लावले. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली होती. शिक्षकांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर दोघांनाही अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.
वाडेगाव येथे शाळेच्या आवारात शिरलेल्या कुत्र्याने घेतला दोन विद्यार्थ्यांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 02:02 IST
वाडेगाव (जि. अकोला) : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात प्रवेश करून एका कुत्र्याने दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना चावा घेतला. ही घटना सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास घडली.
वाडेगाव येथे शाळेच्या आवारात शिरलेल्या कुत्र्याने घेतला दोन विद्यार्थ्यांना चावा
ठळक मुद्देप्राथमिक शाळा (मुले) येथे राष्ट्रगीत झाल्यानंतर घडला प्रकार.कुत्र्याने अनुकुल संतोष लांडे व सुभान खाँ कयुम खाँ दोघांना चावा घेतला.प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर दोघांनाही अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.