अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची भरती, उर्दू शिक्षक घोटाळा, अपंग शिक्षकांची भरती आणि आंतरजिल्हा बदल्या इत्यादी घोळाची गत दोन महिन्यांपासून विभागीय उपायुक्तांच्या नेतृत्वातील समितीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये विभागीय उपायुक्त (आस्थापना) अनिल लांडगे यांनी मंगळवारी पुन्हा जिल्हा परिषद शिक्षण विभागाची झाडाझडती घेऊन, चौकशीसाठी आवश्यक असलेला दस्तऐवज (रेकॉर्ड) ताब्यात घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २00८ ते २0१२ या कालावधीत राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया, उर्दू शिक्षक भरती प्रक्रियेतील घोटाळा, अपंग शिक्षक भरतीमधील घोळ आणि नियमबाह्य करण्यात आलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, इत्यादी घोळाची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त (आस्थापना ) अनिल लांडगे यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. या चौकशी समितीकडून गत दोन महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील घोळाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गत पंधरा दिवसापूर्वी उपायुक्त लांडगे यांनी शिक्षण विभागाला भेट देऊन, चौकशीसाठी आवश्यक असलेल्या फाइल्स व दस्तऐवज ताब्यात घेऊन, पडताळणी केली होती. त्यानंतर पुन्हा १0 नोव्हेंबर रोजी उपायुक्त लांडगे जिल्हा परिषद शिक्षण विभागात झाडाझडती घेऊन, चौकशीसाठी आवश्यक असलेले ह्यरेकॉर्डह्ण ताब्यात घेतले.
उपायुक्तांनी घेतले ‘रेकॉर्ड’ ताब्यात
By admin | Updated: November 14, 2015 02:25 IST