शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला कमी भावात विका, नाही तर जनावरांना खाऊ घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:23 IST

अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्‍यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भाजी उत्पादक शेतकर्‍यांवर ओढवली आहे. 

ठळक मुद्देशेतकर्‍यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव अकोटच्या ठोक बाजारात भाव गडगडले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्‍यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भाजी उत्पादक शेतकर्‍यांवर ओढवली आहे. अकोट तालुक्यात भाजीपाल्याची चांगली आवक झाली आहे; परंतु भाजीपाल्याचा भाव मात्र ठोक बाजारपेठेत गडगडला आहे. त्यामुळे मागणी व पुरवठय़ाच्या असंतुलितपणामुळे सध्या शेतकर्‍यांना भाजीपाला जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. कधीकाळी टमाट्यासह भाजीपाल्याचे भाव बाजारात वाढल्याने महागाईचा मोठय़ा प्रमाणात कांगावा करण्यात येत होता; परंतु आता शेतकर्‍यांना मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भाजीपाल्याच्या अकोट बाजारपेठेत टमाटे ५ ते १0 रुपये किलो, मेथी ३ रुपये किलो, वांगे ३ रुपये किलो, कोथिंबीर २ ते ५ रुपये किलो, पालक २ रुपये किलो, कोबी १0 ते २0 रुपये कट्टा, निंबू ४ रुपये किलो आदींसह हिरव्यागार भाजीपाल्याचे ठोक भाव चांगलेच घसरले आहेत. भाजीपाल्याला मिळणारे भाव पाहता काढणी व वाहतुकीचा खर्चसुध्दा निघणे कठीण झाले आहे. टमाट्यासह इतर भाजीपाला हा ५ ते ६ दिवसांत वापरावा लागतो. नंतर मात्र नाशवंत होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे. भाव वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना भाजीपाल्याची साठवणूक करणे अशक्य आहे. अशा स्थितीत १३ डिसेंबर रोजी अकोट भाजीपाला बाजारपेठमधून जनावरांकरिता भाजीपाला गोरक्षणला पाठविण्यात आला असल्याचे भाजीपाला व्यापार्‍यांनी सांगितले. भाजीपाल्याचे एकदमच उतरलेले भाव भाजीपाला उत्पादकांच्या आर्थिक संकटात भर टाकणारे ठरत आहेत. उलट ठोक बाजारपेठेत शेतकर्‍यांना अत्यल्प भाव मिळत असला, तरी चिल्लर विक्रेते मात्र शेतकर्‍यांनी घामातून पिकविलेल्या भाजीपाला ग्राहकांना अव्वाच्या सव्वा भावात विकत आहेत. 

अकोट बाजारपेठेत भाजीपाला भाव २ रुपयांपासून तर १0 रुपयांपर्यंत किलोचा भाव मिळत आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने भाजीपाला जनावरांना चारा म्हणून पाठवावा लागत आहे. - विनोद अस्वार अध्यक्ष, भाजीपाला असोसिएशन अकोट 

टॅग्स :akotअकोटvegetableभाज्याAkola Ruralअकोला ग्रामीण