शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नावावर अत्याचार नको; शुक्रवारी मूक धरणे आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 01:24 IST

विविध सामाजिक संघटना एकवटल्या : पत्रकार परिषदेत मांडली भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात धोक्यात आलेली सहिष्णुता, सामाजिक ऐक्य, विशिष्ट अजेंडा राबविण्यासाठी देशातील दलित, मुस्लीम, आदिवासी, ओबीसींवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि गोरक्षणाच्या नावाने सुरू असलेला उच्छाद यामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावलेला आहे. देशात सुरू असलेल्या या प्रकाराविरोधात जागरूक भारतीय नागरिक म्हणून ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‘माझ्या नावावर अत्याचार नको’, या संकल्पनेवर जगात आणि देशात सुरू असलेल्या मूक आंदोलनाप्रमाणे अकोल्यातही शुक्रवारी आंदोलन पुकारण्यात येत असल्याची माहिती माजी मंत्री प्रा.अझहर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत दिली.देशातील सद्यपरिस्थितीसंदर्भात भाष्य करताना प्रा. अझहर हुसेन, डॉ. सुभाष तिवारी, राजेंद्र पातोडे यांनी देशातील सामाजिक ऐक्य, सोहार्द आणि बंधुभाव धोक्यात आला आहे. दिवसाढवळ्या देशातील बुद्धिवंत विचारकांच्या हत्या केल्या जात आहेत. पोलिसांना मारेकरी सापडत नाहीत. गोरक्षणाच्या नावावर कायदा बाजूला ठेवून झुंडशाहीचे राज्य निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार प्रशासन मूक डोळ्यांनी पाहत आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यासंदर्भात चिंता व्यक्त करतात; मात्र प्रत्यक्षात काही संघटना या चिंतांना अव्हेरून आपले काम सुरू ठेवत आहेत. हा सर्व प्रकार चिंताजनक असून, भविष्यात अराजकता निर्माण होऊ शकते, अशी भीती पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच सामान्य नागरिक म्हणून अकोला शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते बुद्धिजीवी नागरिक एकवटले असून, शुक्रवार ७ जुलै २०१७ रोजी दुपारी २ ते ४ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संयोजकांनी दिली. या आंदोलनात सामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, डॉ. सुभाष तिवारी, सोशल जस्टीस फोरमचे राजेंद्र पातोडे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मजहरखान, माजी शिक्षणाधिकारी पी. जे. वानखडे, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, युवाराष्ट्रचे धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील, मराठा सेवा संघाचे सरचिटणीस अविनाश नाकट, मुवमेंट फॉर पीस अ‍ॅण्ड जस्टीसचे शहजाद अन्वर, मो. अतिकुर रहमान, ज्येष्ठ नेते वली मोहम्मद, जनसत्याग्रह संघटनचे आसिफ खान, प्रा. सरफराज खान, जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती समाजकल्याणचे सदस्य गौरव कोहचडे, अन्वर शेख, अंधश्रद्धा निर्मूलनचे महानगर संघटक चंद्रकांत झटाले, नगरसेवक झिशान हुसैन, मो. शकील,नितीन सपकाळ, गणेश सुरजुसे, प्रा. संतोष हुसे, मो. उस्मान, सत्यप्रकाश आर्य, सोहेल अहेमद, शाहीद खान, मुस्लीम युवा मंच, जावेद जकारिया, कच्छी मेमन जमात, मो. शाकीर प्रामुख्याने उपस्थित होते.