शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका; जातनिहाय जनगणना करा!

By संतोष येलकर | Updated: December 7, 2023 19:15 IST

सकल ओबीसी महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला

अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे; मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करीत ओबीसी महासंघ व अत्यल्प समाज संघटनेच्यावतीने गुरुवार, ७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला सकल ओबीसी महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.

ओबीसींच्या संविधानिक आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्यावतीने सकल ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. ओबीसींमधील विविध समाज संघटनांना सोबत घेऊन अकोला क्रिकेट क्लब मैदानजवळून काढण्यात आलेला महामोर्चा अकोला शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.

संबंधित मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर करण्यात आले. या मोर्चात ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बालमुकुंद भिरड, प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. संतोष राहाटे, अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल राऊत यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, किरण बोराखडे, तेजस्विनी राहाटे, विजया भिरड, गजानन गवइ, गजानन बोराळे, प्रा.संतोष हुशे,गोपाल काेल्हे, प्रतिभा अवचार, प्रा.मंतोष मोहोड, संजय बावणे, प्रा.सुरेश पाटकर, मीना बावणे, विकास सदांशिव, राम गव्हाणकर यांच्यासह ओबीसींमधील विविध समाजघटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.‘जय संविधान, जय ओबीसी’ घोषणांनी दणाणला परिसर !

मोर्चादरम्यान ‘जय संविधान, जय ओबीसी, ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे ’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांना जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसर दणाणून गेला होता.‘माझे मत आरक्षणवाद्यांनाच’ मोर्चेकऱ्यांनी घेतली प्रतीज्ञा !

मोर्चाच्या समारोपप्रसंगी मोर्चात सहभागी ओबीसी बांधवांना प्रतीज्ञा देण्यात आली. त्यानुसार ‘मी माझे मत आरक्षणवाद्यांनाच देणार ...’ अशी प्रतीक्षा मोर्चेकरी ओबीसी बांधवांनी यावेळी घेतली.ओबीसींनी एकत्र येण्याची गरज : अंजली आंबेडकर

ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे, असे सांगत वेगवेगळ्या जातीमधील घटकांनी ओबीसी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजली आंबेडकर यांनी यावेळी केले. आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसींनी एकत्र येवून राजकीय ताकद वाढविणे गरजेेचे आहे, त्यादृष्टीने पुढच्या काळात जिद्दीने प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण