शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

पिककर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका -  भाजप शिष्टमंडळाचा इशारा

By atul.jaiswal | Updated: June 26, 2018 17:31 IST

अकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँका त्रास देत असतील तर त्यांचा योग्य रीतीने बंदोबस्त करण्यात येईल,असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याला सुखी समृद्ध करण्यासाठी अनेक योजना ...

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जपुरवठा साठी १३२८ कोटी रुपये उपलब्ध करुण दिले.त्यापैकी १३० कोटी जिल्हा बँकांनी वाटप केले; पण राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त ७० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.काही बँक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करून भाजपा सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.

अकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँका त्रास देत असतील तर त्यांचा योग्य रीतीने बंदोबस्त करण्यात येईल,असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याला सुखी समृद्ध करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. तसेच कर्ज कर्जपुरवठा साठी १३२८ कोटी रुपये उपलब्ध करुण दिले. त्यापैकी १३० कोटी जिल्हा बँकांनी वाटप केले; पण राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त ७० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. हा प्रकार सहन केल्या जाणार नाही. दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात रक्कम अर्थ विभागाने उपलब्ध करुन दिल्यानंतरही काही बँक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करून भाजपा सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असून, हा प्रकार जिल्ह्यात खपून घेणार नाही असा इशारा शिष्टमंडळाने दिला. जिल्हाधिकारी तसेच अग्रणी बँकेचे समन्वयक या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसतील, तर अधिकाऱ्यांच्याा विरोधात आंदोलन उभारले जाईल. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, तर याला सर्वस्वी जबाबदार बँक व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी राहतील असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला.आमदार सावरकरांचा पाठपुरावाआमदार रणधीर सावरकर सतत एक आठवड्यापासून शेतकऱ्यां च्या प्रश्नासाठी प्रत्येक बँकेत जाऊन लढा देत आहेत. आमदार सावरकर यांच्यासह महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळाने अकोल्यातील महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, ओरिएंटल बँक, देना बँक, सेंट्रल बँक आदी बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून लवकरात लवकर कर्जवाटपाचा लक्ष्यांक पूर्ण करण्याचा विनंतीवजा इशारा दिला.याप्रसंगी दिला यावेळी गणेश अंधारे, उपसभापती दिनकर गावंडे, जयंत मसने, गणेश कण्डारकर, प्रवीण हगवणे, विवेक भरणे, डॉ. अमित कावरे,अनिल मुरूमकार, दिलीप मिश्रा, विजय परमार, रमेश शिरसाट, शेख रहीम देशमुख , विशाल पाटील आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकरBJPभाजपा