शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

मुख्य रस्त्यालगत खाेदला खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST

अकाेला : जुने शहरातील श्रीवास्तव चाैकात विद्युत वाहिनीच्या कामासाठी महिनाभरापूर्वी मुख्य रस्त्यालगत खड्डा खाेदण्यात आला. आजपर्यंतही हा खड्डा बुजविण्यात ...

अकाेला : जुने शहरातील श्रीवास्तव चाैकात विद्युत वाहिनीच्या कामासाठी महिनाभरापूर्वी मुख्य रस्त्यालगत खड्डा खाेदण्यात आला. आजपर्यंतही हा खड्डा बुजविण्यात आला नसून यामुळे वाहनचालकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे. याप्रकाराची मनपाच्या पश्चिम झाेन कार्यालयाने दखल घेऊन हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

काेराेनामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण

अकाेला : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू केले. परंतु काेराेनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहता पालकांमध्ये भीती व धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. पाल्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य नसल्यामुळे काेराेनाची शक्यता बळावली आहे.

वन्यप्राण्यांमुळे तुरीचे नुकसान

अकाेला : तालुक्यातील भाैरद, डाबकी, अहमदपूर ताकाेडा, खडकी आदी भागात शेतांमध्ये वन्यप्राण्यांनी हैदाेस घातला आहे. यंदा हरभरा, तुरीचे उत्पादन अपेक्षेनुसार हाेइल, असा शेतकऱ्यांचा अंदाज असतानाच रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. वनविभागाने बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

दिवसा सलग वीजपुरवठा द्या !

अकाेला : खरीप हंगामातील नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेतून शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची माेठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु महावितरण कंपनीकडून रात्री विद्युत पुरवठा केला जात असून, रात्री शेतकऱ्यांच्या जिवाला धाेका आहे. त्यामुळे वीज कंपनीने दिवसा सलग वीजपुरवठा देण्याची मागणी हाेत आहे.

परराज्यातून मेंढपाळ दाखल

अकाेला : हिवाळ्यात हाेताच परराज्यांतील मेंढपाळ जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विविध शेतांमध्ये मेंढपाळांनी कुटुंबासहित बस्तान मांडल्याचे पहावयास मिळते. किमान महिना दाेन महिना मुक्काम करणाऱ्या मेंढ्यांमुळे जमिनीची सुपिकता वाढते, असा शेतकऱ्यांकडून दावा केला जाताे.

वाशिम बायपास चाैकात अंधार

अकाेला : शहरातील वाशिम बायपास चाैक ते थेट बाळापूर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील एलइडी पथदिवे मागील चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण हाेत असले तरी बांधकाम झालेल्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे वाशिम बायपास चाैकात अंधाराचे साम्राज्य आहे.

मुख्य नाल्यांची साफसफाईच नाही

अकाेला : शहरातील मुख्य नाल्यांच्या साफसफाईकडे महापालिकेच्या आराेग्य व स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नाले घाण व कचऱ्याने तुडुंब भरली आहेत. यामुळे सांडपाणी वाहून जात नसल्याने त्यामध्ये डासांची पैदास झाली असून, दुर्गंधी पसरली आहे. याप्रकाराकडे नगरसेवकांकडूनही कानाडाेळा केला जात आहे.

व्हॉल्व्ह नादुरुस्त; पाण्याचा अपव्यय

अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात महापालिकेचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपुलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरुस्त झाल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

जलकुंभाचा परिसर जलमय

अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक व जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सिमेंट रस्त्यांची चाळण

अकाेला : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या मुख्य पाेस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या मधाेमध भलेमाेठे खड्डे पडल्याने खड्डा चुकविताना वाहनचालकांची कसरत हाेत आहे. अवघ्या तीन वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.