शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

पाणीटंचाईचे ‘विघ्न’ दूर

By admin | Updated: September 9, 2014 01:13 IST

सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९२२.५0 मिमी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ७0.९६ टक्के असून, सर्वाधिक म्हणजे ११४ मिमी. पाऊस बुलडाणा तालुक्यात पडला आहे.

बुलडाणा : आज, सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९२२.५0 मिमी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ७0.९६ टक्के असून, सर्वाधिक म्हणजे ११४ मिमी. पाऊस बुलडाणा तालुक्यात पडला आहे. त्या खोलाखाल ९0 मिमी. पाऊस हा मेहकरमध्ये ९९ तर मोताळय़ात ९0 मिमी. पाऊस नोंदविला गेला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ह्यफुगलेह्ण असून, नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत. वान प्रकल्पात ९१.६८ टक्के, पेनटाकळी ५७.१३ टक्के, तोरणा २९.५३ टक्के, उतावळी ७0.७४ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १४ सिंचन तलाव १00 टक्के भरले असून, १४ सिंचन तलाव हे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्या गेले आहेत. ** येळगाव फुल्ल..बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात १00 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित गोडबोले दरवाजे उघडले आहेत. बुलडाणा शहराला संपूर्ण वर्षभराच्या पाण्याची तरतूद हा प्रकल्प भरल्याने झाली आहे. या प्रकल्पाची क्षमता १२.४0 दलघमी. एवढी आहे.** खडकपूर्णाचे १९ दरवाजे उघडलेजिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाच्या जलसाठय़ात वाढ झाल्याने आज सकाळी ११ वाजता सर्वच्या सर्व १९ दरवाजे उघडण्यात आले. हे दरवाजे १ फुटापर्यंत उघडण्यात आले असून, ९६९ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. या नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा व धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.** तीन तालुक्यात अतवृष्टीजिल्ह्यात शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी संध्याकाळी चांगलाच जोर धरला. आज सकाळी ८ वाजेपर्यंत बुलडाणा, मेहकर व जळगाव जामोद या तीन तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाली. या तीनही तालुक्यात आज सर्वाधिक पाऊस झाला.** नळगंगा जलसाठय़ात दीड फूट वाढनळगंगा धरणाच्या पाणी पातळीत दीड फुटाची वाढ झाली असून, धरण ४६ टक्के भरले आहे. आठवडापूर्वी धरणात ३७ टक्के पाणी होते. नळगंगा धरणाची पूर्ण क्षमता ६६ फु टाची आहे. सध्या धरणामध्ये ५२ फू ट पाणीसाठा आहे. पलढग प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. या प्रकल्पाची क्षमता ४0३.२0 मीटरची असून, नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ** पैनगंगा नदीला यावर्षीच्या पावसाळ्यातील हा पहिलाच पूर असल्याने मेहकरवासीयांची पूर पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. पैनगंगा नदीवरील पूल ब्रिटिशकालीन असून, तो केव्हाही धोकादायक ठरू शकतो, पुरामुळे या पुलावरुन वाहतूक थांबवून सर्व वाहने बायपास मार्गाने वळवावे लागले. सिंदखेडराजा तालुक्यातील भोगावती नदीला पूर आला आहे; तसेच इतर नदी-नालेही दुथडी भरुन वाहत आहेत.