अकोला : अकोला क्रिकेट क्लब येथे शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत १९ वर्षाआतील गटाचे विजेतेपद भंडारज बुद्रूक येथील सुमनताई वानखेडे कनिष्ठ महाविद्यालयाने वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, पातूरचा पराभव करून पटकाविले. विजयी संघाची निवड विभागीय स्तर स्पर्धेसाठी झाली आहे.उपान्त्य फेरीतील सामन्यात भंडारज संघाने अंजूमन कनिष्ठ महाविद्यालय बाळापूर संघाला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. विजयी संघात प्रणव आठवले, गोविंद घोगरे, पवन परनाटे, शुभम येवतेकर, अमोल इंगळे, मोहित राऊत, राज मौर्य, प्रतीक अमृतकर, अंकुश वाकोडे, प्रफुल सुरवाडे, ऋषिकेश भगत, सौरभ सुरवाडे, सचिन इंगळे, नीलेश तायडे, आकाश बा. तायडे, आकाश रा.तायडे यांचा समावेश आहे. खेळाडूंना संघव्यवस्थापक व्ही.आर.इंगळे, संस्थाध्यक्ष एस.के.वाहुरवाघ, सचिव आर.के.वाहुरवाघ, प्राचार्य एन.पी.गुडधे, प्रा. मंगेश वाहुरवाघ यांचे मार्गदर्शन लाभले. ...
भंडारजच्या खेळाडूंनी जिंकली जिल्हा स्तर क्रिकेट स्पर्धा
By admin | Updated: September 20, 2014 00:37 IST