शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उत्खनन-वाहतूक नियंत्रणासाठी आता जिल्हास्तरीय समित्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:36 IST

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आता वाळू उत्खनन व वाहतुकीसंदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समित्या गठित करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाळू निर्गतीसंदर्भात सुधारित धोरण ३ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील नदीपात्रातील वाळू उत्खनन व वाहतुकीच्या संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण करण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आता वाळू उत्खनन व वाहतुकीसंदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समित्या गठित करण्यात येणार आहेत.शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत वाळू निर्गतीच्या सुधारित धोरणाचा निर्णय ३ सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार राज्यातील नदीपात्रातील वाळू उत्खननासंदर्भात सुधारित कार्यपद्धती अवलंबविण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे विहित करण्यात आली.त्यामध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीसंदर्भात संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समिती आणि प्रत्येक तालुक्यासाठी तालुकास्तरीय वाळू सनियंत्रण समिती गठित करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समिती आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू सनियंत्रण समित्या गठित होणार आहेत.

समितीचे असे आहेत अधिकार व कार्य!

जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीची तीन महिन्यांतून एकदा बैठक घेणे आवश्यक, जिल्ह्यातील वाळूघाटांचे ‘डिजिटायजेशन’ करणे, तालुकास्तरीय समित्यांकडून प्राप्त प्रस्तावावर विचार करून आवश्यकतेनुसार बदल करणे, शासन अधिसूचनेच्या तरतुदीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या गृहनिर्माण योजनांकरिता वाळूघाट राखीव ठेवणे, स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरगुती किंवा शेतीच्या प्रयोजनासाठी पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूघाटातून स्वामित्व धनाच्या दराने वाळू देण्यासाठी वाळूघाट राखीव ठेवणे, हातपाटी, डुबी यासारख्या पारंपरिक पद्धतीने वाळू काढण्यासाठी स्थानिक व्यक्ती तसेच संस्थांना परवाना देण्यासाठी वाळूघाट राखीव ठेवणे, लिलावासाठी वाळूघाट निश्चित करणे, वाळूघाटांच्या पर्यावरणविषयक मान्यतेसाठी शिफारस करणे, पर्यावरणविषयक अनुमती व अन्य कामांसाठी मान्यताप्राप्त सल्लागाराची नियुक्ती करणे.

शासन निर्णयानुसार वाळू निर्गती सुधारित धोरणाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समिती आणि तालुकास्तरीय वाळू सनियंत्रण समिती गठित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू