शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा, बुलडाणा, नागपूरच्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:36 IST

अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे.

अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे. अशी माहिती राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक आणि महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. मंगळवारी अकोल्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.९० टक्के जिल्हा बँकांची परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासोबत विविध योजना थेट पोहोचविण्यासाठी आता राज्य सहकारी बँक पुढाकार घेत आहे. जिल्हा बँकांना केवळ काही टक्क्यांचे कमिशन दिले जाईल, असेही ते येथे बोलले. प्रधानमंत्री आवास योजना जिल्हा बँकांना लागू का नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, अनास्कर यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत केंद्र शासनाचे भागभांडवल असते. त्यामुळे अशा योजना जिल्हा बँकेतून राबविल्या जात नाही. तो धोरणात्मक विषय असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी संचालक आणि अधिकारी यांच्या एक दिवसीय खुले चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून अनास्कर मंगळवारी अकोल्यात होते. दरम्यान, सायंकाळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक संजय भेंडे, अकोला जनता बँकेचे ज्येष्ठ संचालक रमाकांत खेतान, अकोला जनता बँकेचे अध्यक्ष ग्यानचंद गर्ग, आशिष लोहिया व विलास अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.जनता बँकेने दिला शहिदांना एक लाखाचा निधी!राज्यातील सर्व अर्बन बँकांनी शहीद जवानांसाठी पुढाकार घेऊन किमान एक लाख रुपयांची मदत करावी, असा प्रस्ताव ठेवत अकोला जनता बँकेने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. जर अर्बन बँकांनी अशीच मदत केली, तर राज्यातून ४२ लाख रुपयांचा भरघोस मदत निधी आपण देऊ शकतो, असा प्रस्तावही रमाकांत खेतान यांनी येथे मांडला. 

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँकbuldhanaबुलडाणाnagpurनागपूर