शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ १९ हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 15:13 IST

अकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र १४ जूनपर्यंत अडीच महिन्यांच्या जिल्ह्यातील केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३३ कोटी ४८३ रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण खातेदार तीन लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ६५१ शेतकºयांना १७९ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. आदेश-निर्देश दिल्यानंतरही १४ जूनपर्यंत जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १३ टक्क्यांवरच असल्याची स्थिती आहे.

- संतोष येलकरअकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र १४ जूनपर्यंत अडीच महिन्यांच्या जिल्ह्यातील केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. खरीप पेरण्या तोंडावर असल्या तरी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण पुढे सरकत नसल्याची बाब समोर येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३३ कोटी ४८३ रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह राष्ट्रीयीकृत बँका व व्यापारी बँकांमार्फत पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसाळा सुरू झाला असून, खरीप पेरण्या तोंडावर आल्या; मात्र बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप संथ गतीने सुरू असल्याने गत अडीच महिन्यांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील एकूण खातेदार तीन लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना १७९ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण जलद गतीने पुढे सरकत नसल्याने खरीप पेरण्यांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आदेश-निर्देशानंतरही पीक कर्ज वाटप १३ टक्क्यावरच!जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या पृष्ठभूमीवर कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकºयांसह सर्व पात्र शेतकºयांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करून, कर्ज वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला. कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला; परंतु वारंवार आदेश-निर्देश दिल्यानंतरही १४ जूनपर्यंत जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १३ टक्क्यांवरच असल्याची स्थिती आहे.

पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!-कर्ज वाटपाचे उद्दिष्ट :        १ हजार ३३ कोटी ४८३ रुपये-१४ जूनपर्यत कर्ज वाटप :       १७९ कोटी ५५ लाख रुपये-कर्ज वाटपाची टक्केवारी :       १३ टक्के-कर्ज वाटप केलेले शेतकरी :         १९ हजार ६५१पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह!खरीप हंगामासाठी पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे; परंतु पावसाळा सुरू झाला असून, पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू होणार आहेत.खरीप पेरण्या तोंडावर असताना आतापर्यंत केवळ १३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षी जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीbankबँकagricultureशेती