शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासन शेतात; करपलेल्या पिकांची पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:34 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट शेतात भेट देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली.

अकोला: जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील पिके करपली आहेत. अपुऱ्या पावसामुळे जमिनीत चार ते पाच इंचापर्यंत ओलावा असून, चार-पाच दिवसात पाऊस न आल्यास पिके जास्त दिवस तग धरू शकणार नाही, अशी स्थिती आहे. अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर, जांभा, पळसो व दहीगाव गावंडे गावांच्या शिवारात मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट शेतात भेट देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता तक्रार निवारण दिनामध्ये अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर येथील सरपंच, उपसरपंच यांच्या नेतृत्वाखालील गावकऱ्यांनी चालू हंगामामध्ये शेतकºयांनी पेरणी केली असून, पावसाअभावी पिके करपली असल्याचे निवेदन देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार २३ जुलै रोजी पालकमंत्र्यांसह अधिकाºयांनी अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर, जांभा, पळसो व दहीगाव गावंडे या गावातील शेत शिवाराला भेट दिली.

कौलखेड जहागीर येथील विजय गावंडे, पूर्णाजी तायडे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन कपाशी व सोयाबीन पिकाची पाहणी केली. या भागात तुरळक पाऊस झाल्यामुळे या भागातील पिके अपुºया पावसामुळे काही ठिकाणी करपली असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपसरपंच विनायकराव तायडे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रदीप तायडे, अनिल तायडे, निर्मला गावंडे, आशा गावंडे, मनोज तायडेसह इतर ग्रामस्थ होते.जांभा येथील गणेश ठोकळ यांच्या शेतात कपाशी पिकाची प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाहणी केली. या भागातही थोड्या अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत जांभा येथील विनोद ठोकळ, संतोष मानकर, श्रीकांत चिटके यांची उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री यांनी पळसो येथील अकुंश बढे यांच्या शेतात भेट दिली तसेच पळसो येथील महिला बचत गटाच्या महिलांशी पालकमंत्री यांनी चर्चा केली. दहीगाव गावंडे येथील विजय गावंडे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी पळसो येथील दत्ता बोर्ड, महेंद्र काळे, अरुण चौधरी, नंदा लाडे आदीसह ग्रामस्थांची व दहीगाव गावंडे येथील पांडुरंग गावंडेसह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :Dr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी