शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाकद परिसरातील सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:34 IST

वाकद (वाशिम) : रिसोड तालुक्यातील वाकद परिसरात सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. 

शेतकरी संकटात : उत्पादनात घट येण्याची भीतीलोकमत न्यूज नेटवर्कवाकद (वाशिम) : रिसोड तालुक्यातील वाकद परिसरात सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. यावर्षी शेतकºयांना नानाविध संकटातून जावे लागत आहे. कधी पावसाची दीर्घ दडी तर कधी संततधार पाऊस, पावसाची रिपरिप यामुळे अगोदरच पिकांना फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे सोयाबीनवर आता करपा व मुळकूज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिपावसामुळे मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे सांगितले जाते. पिकांच्या मूळांजवळ पाणी साचून राहिल्यास मुळांची श्वसनाची क्रिया मंदावते. परिणामी अन्नद्रव्य शोषण व जमिनीत आधार मिळविणे या दोन्ही कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. फुलोरा किंवा फळवाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकात अन्नद्रव्यांचा भरपूर पुरवठा आवश्यक असतो. अतिरिक्त पाण्यामुळे मुळांची कार्यक्षमता घटून अन्नद्रव्यांचा पुरवठा अपुरा होतो. परिणामी पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होऊन उत्पादनात व दर्जात घट होण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. सोयाबीनच्या शेंंगा काळया पडत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कृषी विभागाच्या चमूने २६ आॅगस्ट रोजी भेट देऊन शेतकºयांना फवारणीसंदर्भात मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या सल्ल्याने काही शेतकºयांनी फवारणीदेखील केली. करपा व मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नुकसानभरपाई देण्याची मागणी सुरेश लाटे, भिकन खॉ पठाण, दत्तात्रय अवताडे यांच्यासह शेतकºयांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती