शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

निधी खर्चावरील बीडीओंची निगराणी हटविली

By admin | Updated: March 12, 2017 02:16 IST

आमचं गाव, आमचा विकास योजनेचा खर्च रखडला.

अकोला, दि. ११- आमचं गाव, आमचा विकास आराखड्यातील कामांसाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे अधिकार आणि निधी ग्रामपंचायतींना देण्यात आला. त्या कामांना तांत्रिक मंजुरी आणि देयक काढताना गटविकास अधिकार्‍यांची स्वाक्षरी असल्याशिवाय निधी खर्च करण्यावर जिल्हा परिषदेने घातलेले निर्बंध अखेर मागे घेण्यात आले. तसे पत्र पंचायत समित्यांना मंगळवारी पाठविण्यात आले. केंद्र शासनाकडून मिळणारा वित्त आयोगाचा निधी ह्यआमचं गाव-आमचा विकासह्ण आराखड्यातील कामांवर खर्च करता येतो. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २0१५-१६ ते २0१९-२0 या काळात विकास आराखड्यातील कामे करता येतात. त्यासाठी वित्त आयोगाच्या लगतच्या दोन वर्षांंतील निधीचे वितरणही झाले आहे. तो निधी पंचायत विभागाने गटविकास अधिकार्‍यांच्या मंजुरीशिवाय खर्च करण्यावर र्मयादा आणल्याने दोन वर्षांत निधी खर्चाचा वांधा झाला आहे. ग्रामपंचायतींचा विकास आराखडा आणि हा उपक्रम सुरू करताना पंचवार्षिक बृहत विकास आराखडा व दरवर्षी वार्षिक कृती आराखडा या दोन प्रकारे करण्यात आला. आराखड्यात अपेक्षित उत्पन्नाचा अंदाज, त्या उत्पन्नाच्या र्मयादेत गरजा आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतींनी कामे घेणे सुरू केली; मात्र त्या कामांनाच ब्रेक लावण्याचा प्रकार गटविकास अधिकार्‍यांनी केला. त्यामुळेच गेल्या वर्षीचा निधी खर्च केवळ १५ टक्के शासनाने २0१५-१६ साठी दिलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हय़ात केवळ १५ टक्के खर्च झाल्याची माहिती आहे. ८५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर तशीच पडून आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे धाव घेतली, तसेच जिल्हा परिषद सदस्यांनीही सभांमध्ये अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे निर्बंंध हटविण्यात आले.