शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:56 PM

देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जेवढी अस्वस्थता मुस्लीम समुदायामध्ये आहे, तेवढीच हिंदू समाजामध्ये आहे. देशातील ६ हजार ७०० जातींच्या रहिवासाचे मूळ पुरावेच कधी चातुर्वर्ण्य व्यवस्थेने निर्माण होऊ दिले नाहीत. देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते पातूर येथे गोंधनी मैदानावर हिंदू-मुस्लीम तथा सर्व जनसमुदायाच्या तीने आयोजित जन आक्रोश सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी काझी मो. सरफराझ होते.यावेळी पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, आम्ही सर्व संविधानासोबत आहोत. आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार मोदी-शाह यांना नाही. आपला देश स्वतंत्र आहे. गांधींनी स्वातंत्र्य दिले; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मानवता दिली. संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही. मनु तुम्हाला नेहमीच पायाखाली ठेवतो, बरं झालं आम्हाला या कायद्यामुळे जात व्यवस्था कळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुरून टाकलेल्या मनुवादी व्यवस्थेचा पुनर्जन्म करण्याचा घाट घातला जातो. जिथे मनु दिसेल, तिथे जाळून टाकू. आता हिंदू-मुसलमानांसह सर्वांचा देशासाठी लढा सुरू झाला, असेही आव्हाड म्हणाले.मंचावर अ. रशिद, मुफ्ती अशपाक, काझी तौसिफ, मौलाना वसिऊल्ला, यासिनखान, हाफिज आरिफरजा, अ. करीम बज्मी, अ‍ॅड. काझी अहमद अली, माजी नगराध्यक्ष हिदायत खान रूमखा, माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुºहान, पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर, पातूर न.प. उपाध्यक्ष सै. मुजाहिद सै. मोहसिन, माजी सरपंच दीपक इंगळे, शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे, बामसेफचे अमोल इंगळे, निर्भय पोहरे, मनोहर खंडारे, दिनेश पोहरे व मो. मेहताब अ. रऊफ उपस्थित होते. संचालन प्रा. समशेर उलहक, नदिम शाह यांनी केले. आभार आरिफ उर्ररहमान यांनी मानले. सभेला पातूर शहर आणि तालुक्यातील हिंदू-मुस्लीम तथा सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी