शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग प्रमाणपत्राच्या अपिलासाठी मुंबईच्या वाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:37 IST

अकोला : दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात संबंधित रुग्णालयांमध्ये आधी झालेला घोळ पाहता नव्या पद्धतीत केलेले बदल दिव्यांगांची परीक्षा पाहणारेच ठरत आहेत.

ठळक मुद्दे डिसेंबर २०१२ पासून राज्यात सॉफ्टवेअर असेसमेंट आॅफ डिसअ‍ॅबिलिटी (एसएडीएम) या संगणक प्रणालीतून हे काम सुरू झाले.दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याचा प्रस्ताव नाकारल्यास अपील करण्याची संधी देण्यात आली.. त्यानंतर मात्र या अपिलीय मंडळात बदल करून थेट मुंबईतच दावा दाखल करण्याचा आदेश शासनाने दिला.

अकोला : दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात संबंधित रुग्णालयांमध्ये आधी झालेला घोळ पाहता नव्या पद्धतीत केलेले बदल दिव्यांगांची परीक्षा पाहणारेच ठरत आहेत. संगणक प्रणालीद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रात दिव्यांगत्वाची टक्केवारी कमी मिळणे, दावा नाकारल्यास अपील करण्यासाठी थेट मुंबईतच धाव घ्यावी लागत आहे. त्यातच संबंधित रुग्णालयांकडून माहिती दिली जात नसल्याने त्यांची ससेहोलपट सुरू असल्याचे चित्र आहे.राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र वैद्यकीय मंडळाकडून दिले जातात. १६ वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ३६ रुग्णालयांसह विविध शासकीय संस्थांच्या ५४ रुग्णालयांतून ही प्रमाणपत्रे दिले जातात. डिसेंबर २०१२ पासून राज्यात सॉफ्टवेअर असेसमेंट आॅफ डिसअ‍ॅबिलिटी (एसएडीएम) या संगणक प्रणालीतून हे काम सुरू झाले. त्याचवेळी या प्रणालीतून प्राप्त प्रमाणपत्रात दिव्यांगत्वाची टक्केवारी कमी असणे, दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याचा प्रस्ताव नाकारल्यास अपील करण्याची संधी देण्यात आली. संबंधित विभागाच्या आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली इतर सदस्यांचा सहभाग असलेल्या मंडळाला अपिलीय मंडळ म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार दिव्यांगांना त्या ठिकाणी अपील करण्याची सोय उपलब्ध होती. त्यानंतर मात्र या अपिलीय मंडळात बदल करून थेट मुंबईतच दावा दाखल करण्याचा आदेश शासनाने दिला. त्यासाठी रुग्णालयाच्या प्रकारानुसार अपिलीय मंडळ १७ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ठरवून देण्यात आले. त्या मंडळाची रचनाही निश्चित करण्यात आली; मात्र या शासन निर्णयाबाबत दिव्यांगांना माहिती न देताच उपसंचालक आरोग्यसेवा कार्यालयात पाठविण्याचे प्रकार अकोला मंडळातील वैद्यकीय महविद्यालये, रुग्णालयाकडून सुरू आहेत.

- काही रुग्णालयांसाठीच मंडळ बदलले!शासनाने दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रावर अपील करण्यासाठी ठरविलेले मंडळ काही रुग्णालयांसाठीच बदलले आहे. त्यामध्ये सर्व शासकीय व महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रासंदर्भातील अपील मुंबई येथील जेजे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे करावे लागते, तर त्याचवेळी सर्व महापालिका रुग्णालये, शासकीय जिल्हा, सामान्य, उपजिल्हा, अस्थिरोग रुग्णालये, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये, कुष्ठरोग रुग्णालयातून दिलेल्या प्रमाणपत्रावरील अपील संबंधित विभागीय उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळाकडे अपील दाखल करता येते. या प्रकारामुळे काही शहरातील दिव्यांगांनाच मुंबईची वारी करावी लागत आहे, तर काहींना स्थानिक स्तरावरच अपीलची सोय ठेवण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य