मनपा प्रशासनाच्या धरसाेड भूमिकेमुळे मागील काही वर्षांपासून शहरात बांधकाम व्यवसायाची अपेक्षित भरभराट हाेऊ शकली नाही. अपुरा चटई निर्देशांक, हार्डशिप अँड कम्पाउडिंगच्या अंमलबजावणीचा तिढा कायम व्यावसायिकांची कुचंबणा हाेत आहे. या संदर्भात क्रेडाईच्या वतीने शासन दरबारी नेहमीच पाठपुरावा करण्यात आला. त्या पृष्ठभूमीवर क्रेडाई अकोलाची कार्यकारिणी घाेषित केली असता, अध्यक्षपदी प्रा.दिनेश ढगे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये माजी अध्यक्ष दिलीप चौधरी, उपाध्यक्ष सुशील खोवाल, जितेंद्र पातुरकर, सचिव शरद सावजी, कोषाध्यक्ष सुरेश कासट, महाराष्ट्र क्रेडाई संयोजक प्रा.इस्माईल नाजमी, महाराष्ट्र क्रेडाई युवा संयोजक सुमित मालाणी, पीआरओ कपील रावदेव, सहसचिव राजेश लोहिया, अभय बिजवे, सहकोषाध्यक्ष धर्मेंद्र सनेना, मो.जावेद, मनोज महाजन, तसेच कार्यकारिणी सदस्यांमध्ये किरण कुळकर्णी, मनोज बिसेन, नितीन हिरुळकर, अनिल ताकवाले, अमरीश पारेख, अमित अग्रवाल, फाजील रझाक, नितीन लहरिया, संजय तुलशान, किशाेर अग्रवाल, विजय बाेर्डे, श्रीधर काळे आदींचा समावेश करण्यात आला आहे.
क्रेडाईच्या अध्यक्षपदी दिनशे ढगे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST