शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा कारागृहातील ३०० कैद्यांना भोजन संचाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 17:52 IST

अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ३०० कैद्यांना आधुनिक भोजन संच भेट देऊन कच्छी मेमन जमातीने बुधवारी आपल्या माणुसकीचा परिचय करून दिला.

ठळक मुद्दे मेमन दिवसाच्या निमित्ताने बुधवारी जिल्हा कारागृहात ३०० कैद्यांना फायबर ताट, वाटी आणि ग्लासचे वाटप तुरुंगात अनेक वर्षांपासून अल्युमिनियमच्या ताटात कैद्यांना भोजन दिले जाते. कैद्यांच्या शरीराची मानवीय दृष्टिकोनातून कच्छी मेमन जमातीने हा निर्णय घेतला.

अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ३०० कैद्यांना आधुनिक भोजन संच भेट देऊन कच्छी मेमन जमातीने बुधवारी आपल्या माणुसकीचा परिचय करून दिला. अकोला कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांच्या कल्पनेतून मेमन दिवसाच्या निमित्ताने बुधवारी जिल्हा कारागृहात ३०० कैद्यांना फायबर ताट, वाटी आणि ग्लासचे वाटप सकाळी १० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी, डॉ. अभय पाटील, डीवायएसपी संजय गोरले, जेल अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सिनियर जेलर सोरटे, अ‍ॅड. महंमद परवेज यांच्या हस्ते भोजन संच वाटप करण्यात आले.तुरुंगात अनेक वर्षांपासून अल्युमिनियमच्या ताटात कैद्यांना भोजन दिले जाते. त्यातून विविध आजार होण्याची शक्यता अलीकडे व्यक्त करण्यात आल्यामुळे कैद्यांच्या शरीराची मानवीय दृष्टिकोनातून कच्छी मेमन जमातीने हा निर्णय घेतला. याचे सर्व मान्यवरांनी कौतुक करून आभार मानले.यावेळी तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, विजय हिवाळे, प्रकाश चव्हाण, जितेंद्र भावसार, सुभेदार घनश्याम तिवारी, कच्छी मेमन जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया, उपाध्यक्ष साजीद नाथानी, सचिव सलिम गाझी, सहसचिव वाहीद मुसानी, कोषाध्यक्ष सादीक लष्करिया, व्यवस्थापक एजाज सूर्या, हाजी यासीम बचाव, हाजी हनिफ मलक, हाजी फारूक भुरानी, इंमत्याज गणोदवालाल, इजाज डोकाडिया, अतिक भटारा, अकील घाची, अनिस घाची, फिरोज दर्या, हाजी असलम घाची आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाjailतुरुंग