शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

दिलीपकुमार सानंदा यांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची अकोल्यात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 18:45 IST

खामगाव : वंचीत बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीपकुमार सानंदा यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यातील यशवंत बंगल्यावर भेट घेतली.

 - योगेश फरपट। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : वंचीत बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीपकुमार सानंदा यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यातील यशवंत बंगल्यावर भेट घेतली. दिलीपकुमार सानंदा हे वंचीत बहुजन आघाडीत तर जात नाही ना ? याबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होती. मात्र दिलीपकुमार सानंदा यांनी ही भेट औपचारिक भेट असल्याचे सांगत बाळासाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. गेल्या आठवड्यात माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खामगावात दिलीपकुमार सानंदा यांची भेट घेतली होती. तेव्हा दिलीपकुमार सानंदा भाजपमध्ये प्रवेश घेतात की काय? याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर आता ४ जून रोजी सानंदा यांनी अकोल्यात वंचीत बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. याठिकाणी माजी मंत्री दशरथ भांडे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थीत होते. बाळासाहेब व सानंदा यांच्यात  आगामी विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने सर्वांसमक्ष खुली चर्चा झाली. यासंदर्भात दिलीपकुमार सानंदा यांच्याशी विचारणा केली असतांना त्यांनी सांगितले की, माझ्या राजकीय कारकिर्दीत बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. अकोला असो की मुंबई जेव्हा बाळासाहेबांची भेट शक्य आहे, तेव्हा मी त्यांची भेट घेत असतो. मंगळवारी सकाळी अकोल्यात त्यांची घेतलेली भेट ही सुद्धा औपचारिक भेट आहे. १९९९ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात जेव्हा खामगाव होते. तेव्हा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरली होती. तेव्हा त्यांच्याशी जवळचा संबध आला होता. तेव्हापासून त्यांच्याशी स्नेह वृद्धींगत होत गेला. मला आमदार बनविण्यासाठी सुद्धा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. काँग्रेस व भारिप बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाडी) हा समविचारी पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या मी नेहमी संपर्कात असतो. मी काँग्रेस पक्षाशी बांधिल आहे. एका राजकीय व्यक्तीने दुसºया पक्षाच्या नेत्याची भेट घेण्यात गैर नाही. त्यामुळे कुणीही उलटसुलट चर्चा करू नये असे सानंदा म्हणाले. 

‘वंचित’च्या पदाधिकाºयांना सत्तेत पाहायचंय ! गेल्या कित्येक वर्षापासून काही पदाधिकारी भारिप बहुजन महासंघासोबत आहे. अशा निष्ठावंंत कार्यकर्त्यांसह पदाधिकाºयांना सत्तेत पाहायचे आहे. यासाठी मदत करायला तयार असल्याची ग्वाही दिलीपकुमार सानंदा यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDilipkumar Sanandaदिलीपकुमार सानंदाPoliticsराजकारण